ट्रेनमध्ये AC बंद, पाणी नसेल तर रेल्वे देणार नुकसान भरपाई
मुंबई, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रेल्वे सध्या कात टाकून अत्याधुनिक रूप धारण करत आहे. जागतिक दर्जाच्या सेवासुविधा प्रवाशांना देण्यासाठी रेल्वे प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र एवढ्या प्रचंड डोलारा सांभाळतानाही सुविधांमध्ये काही तृटी राहून जातात. यासाठी प्रवाशांना नुकसान भरपाई देखील दिली जात आहे. रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या सोयीसाठी काही नियम असतात. ट्रेनमध्ये बेसिक सुविधा असणे बंधणकारक असते. तुम्ही जर एसी कोचचे तिकीट घेतले आहे तर एसी नीट काम करायला हवा.तसेच टॉयलेटमध्ये पाणी असायला हवे. जर रेल्वेकडून यात चुक झाली असेल तर रेल्वेकडून नुकसान भरपाई मिळत असते.
विशाखापट्टनम जिल्ह्यातील जिल्हा ग्राहक लवादाने दक्षिण – मध्य रेल्वे संदर्भात एक महत्वाचा निकाल दिला आहे. या रेल्वे प्रवाशाला 25 हजार नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. एक प्रवासी आपल्या कुटुंबासह तिरुमाला एक्सप्रेसच्या एसी कोचमधून प्रवास करत होता. प्रवासात त्या ट्रेनचा एसी बंद पडला होता. त्याने टॉटलेटमध्ये जाऊन पाहीले तर तेथे पाणी देखील नव्हते.
या कारणाने या प्रवाशांना रेल्वेला तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत विशाखापट्टनम जिल्हाय ग्राहक लवादाने दक्षिण-मध्य रेल्वेला संबंधित प्रवाशाला नुकसाई भरपाई देण्याचे आदेश दिले. रेल्वेची प्रवाशांना बेसिक सुविधा देणे बंधनकारक आहे. ज्यात एसी चालणे, टॉयलेटमध्ये पाणी असणे सर्व सामील आहे.या सविधा नसल्याने प्रवाशांना शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.त्यामुळे रेल्वेला संबंधित प्रवाशांना नुकसाई भरपाई द्यावी लागले असे ग्राहक न्यायालयाने म्हटले आहे.
SL/ML/SL
31 Oct. 2024