27 तासांच्या जम्बो ब्लॉकसाठी रेल्वे सज्ज

 27 तासांच्या जम्बो ब्लॉकसाठी रेल्वे सज्ज

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ब्रिटिश कालीन कर्नाक उड्डाणपूल पडण्यात येणार असून गर्डर काढण्यासाठी १९ ते २० नोव्हेंबरपर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री 11 पासून सीएसएमटी ते भायखळा दरम्यान 27 तासाचा हा ब्लॉक असणार आहे. Railways ready for 27-hour jumbo block

हा पूल पाडण्यासाठी 350 वजनी क्षमता असलेल्या चार क्रेन, चार हायड्रमशीन,40 गॅस कटर व अन्य सामुग्री तैनात करण्यात आली आहे. तसेच पुलावर बांधकाम विभागाचे 400 कर्मचारी कार्यरत असणार आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी काल अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन कर्नाक उड्डाणपूल पाडण्याच्या कामाचा आढावा घेतला. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व रेल्वे अधिकाऱ्यांना वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. दरम्यान, ब्लॉकच्या कालावधीत बेस्टतर्फे सीएसएमटी, कुलाबा, भायखळा, दादर, वडाळा आदी परिसरात विशेष बस सोडण्यात येणार आहेत.

ब्लॉकदरम्यान मेल-एक्स्प्रेस आणि लोकल सेवा सुरळीत राहण्यासाठी त्याबाबतची योग्य आणि नियमित उद्‍घोषणा करावी. मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या शॉर्ट टर्मिनेशनबाबत सर्व प्रवाशांना एसएमएसद्वारे माहिती द्यावी, मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी हेल्प डेस्कची व्यवस्था करावी, प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट आणि एमएसआरडीसी यांनी समन्वय साधत बस सोडाव्यात ,सुरक्षेच्या दृष्टीने आरपीएफने जीआरपी आणि राज्य पोलिसांशी समन्वय साधावा, ब्लॉक कालावधीत विविध स्थानकांवर पोलिस दलांची नियुक्ती करावी अशा सूचना महाव्यवस्थापकांनी या बैठकीत दिल्या.

यासोबत याच ब्लॉक च्या काळात ठाणे , कोपरी पुलाचे नवे गर्डर बसवण्याचे काम ही करण्यात येणार आहे, यासाठी मुंबई – ठाणे दरम्यानची रस्ते वाहतूक इतरत्र वळवली आहे.

ML/KA/PGB
18 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *