UTS App द्वारे रेल्वे तिकीट बुकींग झाले अधिक सोपे

 UTS App द्वारे रेल्वे तिकीट बुकींग झाले अधिक सोपे

मुंबई,दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी उपनगरीय लोकल टेन सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. लोकलच्या तिकीट बुकींग करण्याच्या प्रक्रियेमध्ये सुलभता आणण्यासाठी रेल्वे प्रशासन सातत्याने प्रयत्न सुरू असतात. UTS या रेल्वेच्या अधिकृत App द्वारे आता रेल्वे स्टेशनपासून ५ किलोमिटरच्या अंतराच्या परिघामधुन आता तिकीट काढण्याची सुविधा आता उपलब्ध झाली आहे. याआधी ही सुविधा रेल्वेस्टेशन पासून ३ किलोमिटरच्या परिघात उपलब्ध होती.

त्याचबरोबर उपनगरी नसलेल्या गाड्यांचे UTS App द्वारे तिकिट बुक करण्याची अंतर मर्यादा सध्याच्या ५ किलोमीटरवरून २० किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रवाशांकडून वारंवार आलेल्या मागण्यांमुळे रेल्वेकडून ही सुविधा देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेची जवळपास २५ टक्के तिकिटे एटीव्हीएम आणि ७ टक्के यूटीएस मोबाइल अॅपद्वारे बुक केली जातात. इतर बुकिंग विंडोद्वारे केले जातात.
SL/KA/SL
12 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *