मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान भीषण अपघात, ४ प्रवाशांचा मृत्यू

मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ आज (9 जून) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना (mumbai local train accident) घडली. दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना लटकलेले प्रवासी घासले गेले. सदर घटनेत ट्रॅकवर पडल्यामुळे ४ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे व ९ व्यक्तींना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा, येथे दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ चौकशी करण्याच्या सूचना दिल्या असून अपघातात ज्या 4 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटूंबीयांना मदत म्हणून आम्ही 5 लाख रुपये जाहीर केले आहेत. याशिवाय जखमींना 50 हजार, एक लाख किंवा दोन लाख रुपये दिले जातील. तसेच त्यांचा सर्व उपचार शासनाच्या माध्यमातून केला जाईल. याशिवाय ज्युपिटरला जे दोन रुग्ण गंभीर आहेत, त्यांचा सर्व खर्च शासन करेल, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.
रेल्वेचे काही महत्त्वाचे निर्णय
मुंबई उपनगरासाठी उत्पादन सुरू असलेल्या सर्व रेकमध्ये ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सुविधा असतील. मुंबई उपनगरातील या रेकमध्ये सेवेत असलेल्या सर्व रेकची पुनर्रचना केली जाईल आणि दरवाजे बंद करण्याची सुविधा दिली जाईल, असं मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
नवीन गाड्या येणार आहेत त्या सर्व ऑटोमॅटिक डोर क्लोजेससोबत फिटमेंटने येणार आहेत. आयसीएफद्वारे ज्या एक्झिस्टिंग लोकल आहेत त्या लोकलला रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याची सिस्टिम लावण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती स्वप्नील नीला यांनी दिली.
मध्ये रेल्वेने कल्याणपासून कसारापर्यंत आणि कल्याणपासून कर्जतपर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या लाइनचा विचार केला आहे. दादर, दिवापासून सीएसटीपर्यंत पाचव्या आणि सहाव्या लाइनची प्लॅनिंग केली आहे.
ही लाइन कुर्लापर्यंत झाली असून पुढच्या कामासाठी जागा घेतली जात आहे. सीएसटीवरील सिग्लनची सिस्टिम अपग्रेड केली आहे. लोकलच्या २२ फेऱ्या चालतात त्या वाढवल्या जातील, अशी माहिती स्वप्नील नीला यांनी दिली आहे.
कार्यालयांना देखील विनंती केली होती की, वेळेचे फरक केले तर चांगलं होईल. काहींना आपण स्टॅगर्ट टाइमिंगसाठी कार्यालयांची विनंती आपण केली होती. ज्यात सकाळी १०, १०:३०, ११ अशी कार्यालयीन वेळ केली तर अडचण येणार नाही.
दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
“मध्य रेल्वेमार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दूर्दैवी, क्लेशदायक आहे. रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूनं उपनगरी रेल्वेवरील गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्याकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज अधोरेखीत झाली आहे. उपनगरीय रेल्वेसेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल, असा विश्वास आहे. अपघातात जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून दिवंगत प्रवाशांना दु:खद अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यरेल्वेवर कोपर ते दिवा स्थानकादरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करुन दिवंगत प्रवाशांना श्रद्धांजली वाहिली आहे.
दरम्यान मुंबईत बाहेरच्या राज्यातून येणारे लोंढे यामुळे मुंबईची अवस्था बिकट झाली असल्याचा आरोप महाराष्ट्र निर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. मुंबईतील रेल्वे दुर्घटनेनंतर तरी रेल्वे मंत्र्यांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यातील शहरांची अवस्था बिकट झाली असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. मुंबईतील गर्दी नवीन नाही, अशा वेळी रेल्वेमंत्री काय करत आहेत? हा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.