रायगडातील २८ धरणांपैकी २३ धरणे १००% टक्के तुडुंब.

अलिबाग दि २५– रायगड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग चालू आहे. आज देखील रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला असून रात्रीपासूनच पावसाच्या मोठ्या सरी कोसळत आहेत. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याचे आढळून आले आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील २८ पैकी २३ धरणे ही जुलै अखेरीसच तुडुंब भरली आहेत.
येत्या ऑगस्ट अखेरीस २८ पैकी २८ धरणे संपूर्ण भरण्याची शक्यता आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता एकूण पाणी साठा हा ९४ % भरला आहे. यामुळे रायगडकरांचा वर्षभरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला दिसत आहे.
” अति पर्जन्य परिस्थितीत सुद्धा पाटबंधारे विभाग हे सद्याच्या परिस्थिती सामना करण्यास सुसज्ज झालेले आहे. आवश्य असल्यास योग्य ती कारवाई सुरू आहे, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाशी २४ तास संपर्क असून गंभीर आपत्ती परिस्थिती मध्ये आमची यंत्रणा सुसज्ज आहे. ” असा विश्वास कार्यकारी अभियंता मिलिंद पवार यांनी व्यक्त केला आहे. ML/ML/MS