किल्ले रायगडचे दर्शन आता हेलिकॉप्टर सफरीने
महाड, दि. २८(एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेली स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड सर्व शिवप्रेमीना हवाई मार्गाने पाहण्याची सुवर्णसंधी आता अनुभवता येणार आहे. Raigad fort can now be seen by helicopter.
शामंतक हॉस्पिलिटी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या शुभारंभ पर्यटन संस्थेच्या माध्यमातून १० व ११ डिसेंबर २०२२ रोजी या हवाईसफरीचा आनंद सर्वांना घेता येणार आहे.
कोकणातील पर्यटन वाढावे व पर्यटनाच्या मध्यमातून इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्राचा देखील पर्यटन विकास व्हावा या हेतूने शुभारंभ पर्यटन संस्था गेल्या काही वर्षांपासून काम करत असल्याची माहिती संचालक रुपेश तरल व अमित नारकर यांनी आयोजित पत्रकार परिषदे दरम्यान दिली.
आतापर्यंत गणपतीपुळे, दापोली या दोन ठिकाणी अशाच पद्धतीने हवाई सफरीचे आयोजन करण्यात आले होते, आणि त्यामुळे तेथील पर्यटनात व स्थानिक रोजगारात चांगलीच वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
आता तिसरी हवाई सफर किल्ले रायगड दर्शनाची आयोजित केली असून आपली स्वराज्याची राजधानी बाराशे एकरवर कशी वसली आहे ते हवाईमार्गे पाहण्याचा आनंद सर्वसामान्य नागरिकांस व तमाम शिवप्रेमींना घेता येणार आहे.
स्थानिकांसाठी हे हवाईदर्शन प्रत्येकी फक्त रू. ५०००/- रुपये ठेवण्यात आले आहे. तर मुंबई ठाणे व इतर अन्य ठिकाणाहून येणाऱ्यांसाठी येण्या – जाण्यापासून पर्यटन व्यवस्था आखण्यात आली असून सवलतीच्या दरात प्रत्येकी फक्त रू. १०५००/- रुपयांमध्ये किल्ले रायगड हवाई दर्शन अनुभवता येणार आहे.
यामध्ये हवाईसफरी सोबतच राहणे, नाश्ता, जेवण, रोपवे तिकीट तसेच अनुभवी गाईडद्वारे रायगड किल्ल्याची माहिती व प्रमुख स्थळांना भेटी इत्यादी व्यवस्था असणार आहे.
ML/KA/SL
28 Nov. 2022