पुरातत्व खाते जागे झाले,
रायगडाचे थकीत वीजबिल वीज कंपनीला अदा…

 पुरातत्व खाते जागे झाले,रायगडाचे थकीत वीजबिल वीज कंपनीला अदा…

महाड दि ३० : (मिलिंद माने)
राज्यात सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना दिवाळीच्या पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर दीपोत्सवादरम्यान वीज प्रवाह नसल्याने संपूर्ण रायगड किल्ला अंधाराच्या खाईत लोटला होता . याचे वृत्त जाहीर झाल्यानंतर व त्यातच रायगड किल्ल्यावरील मागील नऊ महिन्यापासून वीज बिल थकल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पुरातत्व विभागाला जाग आली व प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी या प्रकाराची तात्काळ दखल घेतल्याने पुरातत्व विभागाने अखेर वीज वितरण कंपनीला दंडासहित ५६५१० रुपये अदा केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरील विज बिल मागील नऊ महिन्यापासून थकले होते याबाबत केंद्र शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याने विज बिल थकले का ? असे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर या वृत्ताने सर्वप्रथम राज्य सरकार व केंद्र सरकार खडबडून जागे झाले. त्यातच रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे हे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात प्राधिकरणाच्या नियमित बैठकीसाठी आले असता त्यांनी संबंधित थकीत विज बिल भरण्यासाठी सी .एस .आर फंडातून निधी उपलब्ध केला जाईल असे सांगितले होते. तेव्हा तात्काळ पुरातत्त्व विभागाने महाड येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ९ महिन्याच्या दंडासहीत थकीत वीज बिल ५६५१० रुपये वीज मंडळाच्या महाड येथील कार्यालयात भरणा केली.

केंद्रातील सत्ताधारी असो व राज्यातले सत्ताधारी असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थानांमधील सत्ताधारी असो प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामस्मरणाने सभेपासून उद्घाटन समारंभापर्यंत ते थेट विधानसभेतील आमदारकीची ते मंत्री पदाची शपथ घेण्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जात नाही.

रायगड किल्ल्यावर असणारे सौर ऊर्जेचे दिवे निकृष्ट दर्जाचे असल्याने व पुरातत्व खात्याच्या बेजबाबदारपणामुळे दिवाळी सणाच्या पहिल्याच दिवशी किल्ले रायगडावर (दीपोत्सव) “शिवचैतन्य सोहळा” शिवराज्याभिषेक दिन उत्सव सेवा समिती व दुर्गराज रायगडच्या वतीने किल्ले रायगडावर दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

” पहिला दिवा माझ्या राजाच्या चरणी या भावनेतून हा कार्यक्रम साजरा होता केला या कार्यक्रमाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्त रायगडावर दाखल झाले होते मात्र या शिवभक्तांना किल्ल्यावरील अंधाराचा साम्राज्याचा सामना करावा लागला होता मात्र शिवभक्तांनी किल्ल्यावरील अंधारावर मात करत रायगडच्या प्रत्येक कड्यावर व प्रत्येक दगडावर दीपोत्सवाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे राजधानी असणारा किल्ले रायगड पुन्हा लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून काढला.

किल्ले रायगडावर वीज महामंडळाकडून वीज पुरवठा केला जातो मात्र याचे बिल पुरातत्व खाते अदा करते मात्र मागील नऊ महिन्यापासून पुरातत्व खात्याने किल्ले रायगडावरील वीज महामंडळाचे वीज बिल थकवले होते. हे वीज बिल का थकवले आहे याचे कारण पुरातत्व खाते स्पष्ट करत नसल्याने केंद्र सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे का ?असा प्रश्न यामुळे उपस्थित होत होता. तब्बल नऊ महिने वीज महामंडळाचे ४१६१९.९४ रुपयांचे बिल भरायला पुरातत्व खात्याकडे पैसा नाही का? अशा मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर केंद्र शासनासहित राज्य शासनाला याची जाग आली .

रायगड किल्ल्यावरील पुरातत्त्व खात्याकडे प्रलंबित असलेल्या व भरणा केलेल्या वीज बिलांची माहिती पुढील पुढील प्रमाणे;

१) रायगड बुकिंग ऑफिस (६५८८.१५ रुपये.) थकीत होते दंडा सहित भरणा केलेली रक्कम ९४७० रुपये

२) जगदीश्वर मंदिर (११७०८.०४ रुपये) थकीत होते दंडासहीत भरणा केलेली रक्कम १२४८० रुपये
३) राज दरबार (२३३२३.७५ रुपये) थकीत होते दंडा शहीद भरणा केलेली रक्कम२४०००. रुपये

एकूण थकबाकी ४१६१९.९४ रुपये होती मात्र रायगड किल्ल्यावरील पुरातत्व खात्याच्या ताब्यात असणाऱ्या दोन वीज मीटरची देखील थकबाकी होती ती देखील दंडासहीत भरण्यात आली आहे.

४) रायगड किल्ला ग्राहक क्रमांक(०४१४९४१००३८८ विज बिल रक्कम दंडासहित ७३२० रुपये
५) रायगड किल्ला ग्राहक क्रमांक( ०४१४९५०००२८०) विज बिल रक्कम दंडासहीत ३२४० रुपये
असे पुरातत्व विभागाने दंडा सहित ५६५१० रुपये २९ ऑक्टोंबर २०२५ रोजी भरणा केले.

महाड सहित रायगड जिल्ह्यातले पुढार्‍यांनी थकीत वीज बिलासाठी का? पैसे भरले नाहीत जनतेचा सवाल
रायगड जिल्ह्यातील महाड सहित जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडे गडगंज पैसा असून लोकांना रोजचे पैसे वाटणारे पुढारी व करोडो रुपयांच्या आलिशान वातानुकूलित गाड्यांमधून व करोडो रुपयांच्या आलिशान बंगल्यांमधून व हजारो एकर जमिनीचे मालक असणारे रायगड जिल्ह्यातील सर्वपक्षीय पुढारी दररोज लाखो रुपये खर्च करीत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्यकारभार करणाऱ्या तथाकथित पुढार्‍यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगडावरील थकीत ५० हजार रुपयांचे विज बिल भरण्यासाठी कोणता च लोकप्रतिनिधी पुढे आला नाही याबाबत महाड पासून रायगड जिल्ह्यात या तथाकथित पुढाऱ्यांबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *