केंद्र सरकारच्या तिजोरीत खडखडाट?, रायगड अंधाराच्या खाईत…
महाड दि २८ : (मिलिंद माने)
राज्यात सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना दिवाळीच्या पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर दीपोत्सवादरम्यान विज प्रवाह नसल्याने संपूर्ण रायगड किल्ला अंधाराच्या खाईत लोटला होता असे असताना रायगड किल्ल्यावरील मागील नऊ महिन्यापासून वीज बिल थकले असून केंद्र शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याने विज बिल थकले का ?असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे .
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणारा रायगड किल्ला असल्याने महाड वीज मंडळाच्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे किल्ल्यावरील वीजपुरवठा अजूनही अबाधित राहिला आहे मात्र पुरात्व खात्याचा
बेजबाबदारपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
केंद्रातील सत्ताधारी असो व राज्यातले सत्ताधारी असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थानांमधील सत्ताधारी असो प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामस्मरणाने सभेपासून उद्घाटन समारंभापर्यंत. ते थेट विधानसभेतील आमदारकीची शपथ घेण्यापर्यंत महाराजांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जात नाही.
रायगड किल्ल्यावर असणारे सौर ऊर्जेचे दिवे निकृष्ट दर्जाचे असल्याने व पुरातत्व खात्याच्या बेजबाबदार
पणामुळे दिवाळी सणाच्या पहिल्याच दिवशी किल्ले रायगडावर (दीपोत्सव) “शिवचैतन्य सोहळा” शिवराज्याभिषेक दिन उत्सव सेवा समिती व दुर्गराज रायगडच्या वतीने किल्ले रायगडावर दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
” पहिला दिवा माझ्या राजाच्या चरणी या भावनेतून हा कार्यक्रम साजरा होता केला या वेळेला रायगडच्या प्रत्येक कड्यावर व प्रत्येक दगडावर दीपोत्सवाच्या माध्यमातून किल्ले रायगडावर कार्यक्रम साजरा होत असताना या वेळेला अंधाराचे साम्राज्य पसरल्याचे चित्र होते.
किल्ले रायगडावर वीज महामंडळाकडून वीज पुरवठा केला जातो मात्र याचे बिल पुरातत्व खाते अदा करते. मागील नऊ महिन्यापासून पुरातत्व खात्याने किल्ले रायगडावरील वीज महामंडळाचे वीज बिल थकवले आहे. हे वीज बिल का थकवले आहे याचे कारण पुरातत्व खाते स्पष्ट करत नसल्याने केंद्र सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे का असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.
तब्बल नऊ महिने वीज महामंडळाचे पन्नास हजार रुपयांचे वीज बिल भरायला पुरातत्व खात्याकडे पैसा नाही का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. मात्र वीज महामंडळाच्या साम जसाच्या भूमिकेमुळे केवळ “छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला “या भावनेतून वीज महामंडळाने किल्ले रायगड चे थकित वीज बिल असतानाही विद्युत पुरवठा खंडित केला नाही.
रायगड किल्ल्यावरील पुरातत्त्व खात्याचे प्रलंबित वीज देवकांची माहिती पुढील प्रमाणे
१) रायगड बुकिंग ऑफिस ६५८८.१५ रुपये
२) जगदीश्वर मंदिर ११७०८.०४ रुपये
३) राज दरबार २३३२३.७५ रुपये
एकूण थकबाकी ४१६१९.९४ रुपये
ML/ML/MS