रायगड जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा कोमात; सत्ताधारी सुस्त, तर जनता त्रस्त

 रायगड जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा कोमात; सत्ताधारी सुस्त, तर जनता त्रस्त

मुंबई, दि . 26
पावसाळा सुरू होण्यापूर्वी अवकाळी पावसाने रायगड जिल्ह्यात धुमाकूळ माजवला असताना रायगड जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा मात्र कोमात गेली आहे तर रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मस्त झाले असून शासकीय अधिकारी मालामाल झाले असून याचा महाराष्ट्र जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना भोगाव लागत असून रस्ते वीज व अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटल्याने पुढील चार महिन्यात पावसाळ्यात सर्वसामान्य जनता मात्र हतबल होणार असल्याचे आतापासूनच स्पष्टपणे दिसत आहे
रायगड सह कोकणात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असताना व अवकाळी पावसाचे हवामान खात्याने अंदाज वर्तवले असताना देखील शासकीय आपत्कालीन यंत्रणा मात्र का कार्यान्वित झाली नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे रायगड जिल्ह्यातील महाड , पोलादपूर सह श्रीवर्धन ,माणगाव ,रोहा, तळा, म्हसळा या तालुक्यात अवकाळी पावसामुळे रस्ते वीज व अनेक गावांचा संपर्क तुटण्याची घटना मागील दोन दिवसात मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत.
महाड तालुक्यातील शासकीय निधीतून होत असलेले महाड मंडणगड रस्ता, महाड रायगड रस्ता, महाड पंढरपूर भोर रस्ता, महाड औद्योगिक वसाहतीकडे जाणारा रस्ता त्याचबरोबर महाड शहरातील सर्वच रस्त्यांवर प्रमाणात पावसाचे पाणी साठलेले दिसत होते शासकीय यंत्रणा मात्र सुट्टीवर गेल्या होत्या परिणामी नागरिकांना मात्र मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता
महाड एसटी आगाराला तळ्याचे स्वरूप
कोकणातील मध्यवर्ती आगार म्हणून ओळखले जाणारे महाड आगारात करण्यात आलेले काँक्रिटीकरणाचे काम नियोजन शून्य अभावामुळे झाल्याने आगारातील प्रवासी वाहतूक कक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचल्याने पूर्ण आकाराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते मात्र आपत्कालीन यंत्रणेच्या अधिकारी मात्र शनिवार रविवार असल्याने सुट्टीवर गेले होते एकंदरीत राजकीय लोकप्रतिनिधींच्या नियोजन शून्य कारभारामुळे शासकीय यंत्रणेचे अधिकारी मालामाल झाले आहेत तर याचा त्रास मात्र सर्वसामान्य नागरिकांना पावसाळ्यात भोगावे लागणार आहे.KK.MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *