कांदिवलीत एमडी कारखान्यावर छापा; 1 कोटी 17 लाखाचे साहित्य जप्त

 कांदिवलीत एमडी कारखान्यावर छापा; 1 कोटी 17 लाखाचे साहित्य जप्त


मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मालवणी पोलिसांनी कांदिवली येथील एका सोसायटीच्या एमडी अमली पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून उद्ध्वस्त केला आहे.या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून 1 कोटी 17 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.


बृहन्मुबईतील सर्व पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थाची तस्करी तसेच खरेदी विक्री करणा-या व्यक्तींचा शोध सुरू असताना, 5 जानेवारीला मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अबरार इब्राहीम शेख (वय 30 )याला 1 ग्रॅम व 100 थीनरच्या बोटलसह अटक केली होती. अबरार शेख याच्याकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता त्याने हा अमली पदार्थ नूर आलम मेहबुब आलम चौधरी(वय 24 ) याचेकडुन प्राप्त केला असल्याची माहीती दिली. त्यानुसार नूर आलम चौधरी यांचा शोध घेण्यात येत होता.


9 जानेवारीला त्याचा शोध घेत असताना गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहिती प्रमाणे तसेच तांत्रीक माहीतीच्या आधारे पथकाने
समता वेल्फर सोसायटी, चारकोप इस्लाम कंपाऊंड कांदिवली (प.), येथे छापा टाकला. तेथे पाहिजे आरोपी नूर आलम मेहबुब आलम चौधरी हा “एम डी” हा अंमली पदार्थ बनवताना साहित्यासह मिळून आला.


या घटनेबद्दलची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. वरिष्ठांचे आदेशाने कलम-8 (क) सह 22,22 (क), 29,1985 एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत योग्य त्या सर्व तांत्रिक बाबीची पुर्तता करून दोन पंचासमक्ष झडती घेतली असता एकुण 503 ग्रॅम उच्च प्रतीचा मेप्फेड्रॉन हा अमली पदार्थ झडती पंचनाम्यात मिळुन आला. एका खोलीच्या झडतीमध्ये एमडी हा अंमली पदार्थ बनवण्याकरीता लागणारे केमीकल, इतर साहित्य व मशिन्स हे साहित्य असे एकुण 1 कोटी 17 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो पंचनाम्यां अतर्गत जप्त करण्यात आला.


नूर आलम मेहबुब आलम चौधरी यास मालवणी पोलीस ठाणेचे नमूद गुन्हयात 10 जानेवारी रोजी रितसर अटक करण्यात आली. त्यास न्यायालयासमोर हजर कले असता 15 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केलेली आहे. परिमंडळ-११चे पोलीस उपायुक्त अजय कुमार बन्सल, सहाय्यक पोलीस आयुक्त (मालवणी विभाग) शैलेंद्र धिवार यांचे मार्गदर्शनाखाली मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव , पो. नि. मारोती शेळके, सपोनि. निलेश साळुंके, पो.ह.अनिल पाटील,बुगडे, पो.शि.राठोड, विलास आव्हाड, सचिन वळतकर यांनी ही कारवाई केली. raid on MD factory in Kandivli; Materials worth 1 crore 17 lakh seized

ML/KA/PGB
11 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *