अदानींच्या हिमाचल प्रदेशातील स्टोअरवर छापा
शिमला,दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिमाचल प्रदेश राज्य उत्पादन शुल्क आणि कर विभागाने बुधवारी (दि.८) रात्री उशिरापर्यंत राज्यातील अदानी विल्मार स्टोअरवर छापा टाकला आणि गोदामातील कागदपत्रांची तपासणी केली. उत्पादन शुल्क विभागाच्या दक्षिण अंमलबजावणी विभागाचे आणखी एक पथकही रात्री दुकानात पोहोचले होते.
काय आहे अदानींचे म्हणणे
अदानी विल्मरने हिमाचल गोदामावरील कथित छाप्यांवर विधान जारी केले, ‘नियमित तपासणी, छापा नाही’ असे म्हटले आहे.
कंपनीने हे देखील स्पष्ट केले आहे की, कंपनी जबाबदार आणि पारदर्शक पद्धतीने व्यवसाय करण्यासाठी वचनबद्ध आहेत आणि त्यांचे सर्व कामकाज संबंधित कायदे आणि नियमांचे पूर्ण पालन करत आहेत. आणि अहवालानुसार, भेटीनंतर डेपोचे कामकाज सामान्यपणे चालू असल्याचेही म्हटले आहे.
9 Feb. 2023