आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन

 आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन

अहिल्यानगर दि १७ – माजी मंत्री तथा राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आहे. राहुरीच्या आमदारकीसह त्यांच्याकडे अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचं अध्यक्षपदही होतं. आज पहाटे त्यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते.

शिवाजीराव कर्डीले यांना आज पहाटे त्रास जाणवू लागला. त्यांना अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं. कर्डीले हे भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत त्यांना हॅटट्रिक करता आली नाही. त्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्राजक्त तनपुरे यांनी कर्डीले यांचा पराभव केला होता. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत कर्डीले यांनी जोरदार पुनरागमन केलं. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या प्राजक्त तनपुरे यांचा तब्बल ३४ हजार मतांनी पराभव करत पुन्हा एकदा विधानसभा गाठली होती.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कर्डीले यांना १,३५,८५९ मतं मिळाली होती. तर, तनपुरे यांना १,०१,३७२ मतं मिळाली होती. शिवाजीराव कर्डीले हे मूळचे आहिल्यानगर जिल्ह्यातील बुऱ्हानगर गावचे रहिवासी आहेत. येथूनच त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *