राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा बहाल

नवी दिल्ली, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना खासदारकी पुन्हा बहाल झाली आहे. गुजरात कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देऊन सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी राहुल यांना मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर कोर्टाच्या निर्णायची प्रत आणि अन्य कागदपत्र काँग्रेसनं तातडीनं लोकसभा सचिवालयाकडे सुपूर्द केले होते. आज सकाळी लोकसभा सचिवालयाची बैठक झाली, ज्यामध्ये यााबबत अधिसूचना जारी करण्यात आली.
आडनाव प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे राहुल गांधी आता संसदेच्या अधिवेशनात दिसणार आहेत. राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्याची अधिसूचना देखील काढण्यात आली आहे. यामध्ये संपूर्ण गोषवारा देण्यात आला असून राहुल गांधी यांची 24 मार्च रोजी खासदारकी रद्द करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचा नवा आदेश आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे, असं या आधिसूचनेत नमूद केले आहे.
दरम्यान, विरोधक उद्या संसदेत अविश्वास प्रस्ताव आणणार आहेत
SL/KA/SL
7 Aug 2023