राहुल गांधींनी शेतकऱ्यांसह केली भात कापणी
रायपूर, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्तीसगड दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी नवा रायपूरजवळील काथिया गावात शेतकऱ्यांसह भात पिकाची कापणी केली. हातात विळा आणि डोक्यावर गमछा बांधून शेतकरी वेशात शेतकऱ्यांसह राबताना दिसले. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्टदेखील केली आहे. ज्यामध्ये राहुल गांधी आणि गृहमंत्री ताम्रध्वज साहू हातात भाताचे पीक घेतलेले दिसत आहेत. यावेळी राहुल गांधींसोबत मुख्यमंत्री भूपेश बघेल, उपमुख्यमंत्री टीएस सिंहदेव, विधानसभा अध्यक्ष चरणदास महंत आणि गृहमंत्री ताम्रध्वज साहू हेही उपस्थित होते. राहुल गांधी यांनी छत्तीसगडच्या योजनांबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली.
ट्विटमध्ये राहुल गांधींनी यांनी काय लिहिल आहे की, शेतकरी सुखी तर भारत सुखी! छत्तीसगडमधील शेतकऱ्यांसाठी काँग्रेस सरकारची 5 सर्वोत्तम कामे आहेत.
- धानावर एमएसपी ₹2,640/क्विंटल
- 26 लाख शेतकऱ्यांना 23,000 कोटी रुपयांचे इनपुट सबसिडी
- 19 लाख शेतकऱ्यांचे 10,000 कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले
- वीज बिल निम्मे
- 5 लाख शेतमजुरांना ₹7,000/वर्ष
दरम्यान छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात ज्या जागांवर मतदान होणार आहे, त्या जागांसाठी राहुल गांधी प्रचार करत आहेत. आज राजनांदगाव येथील मेळाव्याला संबोधित केले. यानंतर दुसरी सभा कावर्धा येथे होणार आहे. राजनांदगाव हा माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. रमण सिंह यांचा मतदारसंघ असल्याने हा हायप्रोफाईल जागा मानली जाते.
SL/KA/SL
29 Oct. 2023