लालकिल्ल्यावरील ध्वजारोहणाकडे राहुल गांधींनी फिरवली पाठ

नवी दिल्ली, दि. १५ : विरोधी पक्षनेता राहुल गांधी हे आज लाल किल्ल्यावर झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहीले नाही. राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहण केले. हे दोन्ही नेते लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाला उपस्थित नसल्याबद्दल भाजपाने राहुल गांधीवर टीका केली.
भाजपा प्रवक्ता शहजाद पुनावाला यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर लिहिले की, आताच मी एका वाहिनीवरील चर्चेत सहभागी झालो होतो. त्यावेळी काँग्रेस प्रवक्त्यांकडून मला हे समजले की राहुल गांधी व मल्लिकार्जुन खरगे यांनी लाल किल्ल्यावरील ध्वजारोहणाला जाणे टाळले. त्यांचे हे कृत्य देशविरोधी असून ते पाकिस्तानचे चाहते असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. ते देशाचा व देशातील सैन्याचा नेहमीच विरोध करत आलेले आहेत.
दरम्यान, राहुल गांधी व खरगे यांनी दिल्लीच्या इंदिरा भवन येथे ध्वजारोहण केले. काँग्रेसने आपल्या एक्स अकाऊंटवर म्हटले की, आम्ही लोकशाही व घटनेप्रती वचनबद्ध असून त्याच्या रक्षणासाठी सदैव तयार राहू. या ध्वजारोहणाच्या वेळी राष्ट्रगीत सुरु असताना पाऊस आला. मात्र राहुल गांधींनी विचलीत न होता पावसातच उभे राहून राष्ट्रगीत पूर्ण होऊ दिले. यावेळी असंख्य काँग्रेस नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी उत्फुर्तपणे उपस्थित होते.
SL/ML/SL