राहू – केतू करणार परिवर्तन,जाणून घेऊया आपले राशीफळ
मुंबई दि २९ : राहू आणि केतू राशी बदल या वर्षातील सर्वात मोठे राशी संक्रमण 30 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. सुमारे दीड वर्षानंतर छाया ग्रह राहू-केतू आपली राशी बदलणार असून गुरु चांडाल योगाचा प्रभावही संपुष्टात येईल. पाहूया त्याचा नेमका काय प्रभाव पडणार आहे ते.
11 एप्रिल 2022 पासून राहू मेष राशीत तर केतू तूळ राशीत आहे. आता दीड वर्षांनी म्हणजे राहू मेष राशीतून मीन राशीत जाईल, तर केतू तूळ राशीतून कन्या राशीत जाईल आणि दोघेही दीड वर्ष या राशीत राहतील.
राहू-केतू असे मायावी ग्रह आहेत, त्यांची नावे ऐकताच लोक घाबरतात. ज्योतिषशास्त्रात त्यांना छाया ग्रह म्हणतात. या दोन ग्रहांमुळे कुंडलीत कालसर्प दोष, पितृदोष, गुरु चांडाल योग, अंगारक योग, ग्रहण योग इत्यादी बनतात, ज्याचा व्यक्तीच्या जीवनावर अतिशय अशुभ प्रभाव पडतो.
प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सर्वाधिक संथ प्रवास करणारा ग्रह म्हणून शनीची ओळख आहे. त्यानंतर राहू आणि केतू हे ग्रह सर्वात संथ आहेत. राहू आणि केतूला राशी परिवर्तनासाठी जवळपास दीड वर्षे लागतं.
शनी प्रमाणेच हे दोन्ही ग्रह भीतीदायक समजले जातात. यांच्या कोपापासून वाचण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. मात्र, कधी कधी या ग्रहांच्या स्थानातील बदल काही राशींसाठी खूपच उपयुक्त आणि लाभदायी ठरतो. राहू शिवाचा परम भक्त असल्याने शिवाची उपासना करावी.शक्यतो राहू ३,६,११ या स्थानी असता चांगली फळे देतो .षष्ठातला राहू विजययोग देतो
राहू या ग्रहाचे कारकत्व हे पितरांचे आहे. काळा रंग ,कपटी,मंत्रतंत्र विद्या,गरुडही विद्या,दैवी आपत्ती.भूतबाधा,वेड लागणे,विषारी जनावरांपासून त्रास,घराण्यातील शाप,वास्तू दोष,रोगांचे निदान बरोबर न होणे ,चुकीचे औषधोपचार होणे. ज्या स्थान आणि ज्या ग्रहाबरोबर असतो तेथील अशुभ फळे देतो.
आर्द्रा,स्वाती,शततारका ही राहूची नक्षत्रे आहेत. महा दशेत राहू ला १८ वर्षे दिली आहेत. जर पत्रिकेतील राहू चांगला असेल तर मानसन्मान ,कीर्ती ,राजयोग,सांपत्तिक उत्कर्ष प्राप्त करून देतो.
केतू हा ग्रह राहू प्रमाणेच पीडा कारक आहे.आई वडील या वरून पाहतात .अघोरी विद्या,भोंदूगिरी,व्रणविकार,असह्य,असाध्य क्लेश देणारी दुखणी,त्वचेचे रोग,अलर्जी,प्लँचेट ,संन्यास
जर पत्रिकेतील केतू चांगला असेल तर मनुष्याला अध्यात्माची आवड निर्माण होते आणि या विषयात प्रगती होते.
राशीफळ
(हे वर्णन ढोबळमानाने मांडले असून,व्यक्तीचे भविष्य त्याच्या मूळ कुंडली वरूनच अचूक वर्तवता येते)
मेष – खर्च वाढतील,हॉस्पिटलशी संबंध,घरापासून लांब जाण्याचे /परदेशी जाण्याचे योग ,शाररिक त्रास खासकरून पावलांना त्रास ,ठेच लागणे जखम होणे. टाचांचे त्रास,पाय दुखणे, डोळ्यासंबंधी त्रास/किंवा ऑपरेशन ,मानसिक ताण,कार्यक्षेत्रात अनिश्चितता ,जमिनीचे व्यवहार काळजीपूर्वक करावेत.
वृषभ – चांगला लाभ होईल (लाभस्थानाती राहू),नवीन व्यवसाय/कमाईची दारे उघडतील परंतु राहू फसवा ग्रह असल्याने कुठलीही गोष्ट सावधानीनेच करावी ,स्टॉक मार्केट मध्ये काळजीपूर्वक गुंतवणूक करावी. मनातील तीव्र इच्छा पूर्ण होण्याकरिता अनुकूल काळ. व्यवसायातील भागीदारांबरोबर वाद टाळावेत.
मिथुन – नोकरीत उन्नती.मानसन्मान ,प्रगती ,प्रतिष्ठा ,आर्थिक लाभ, करियरला दिशा मिळेल नवी नोकरी संधी मिळेल. कामाची दगदग वाढेल त्यामुळे शाररिक आणि मानसिक ताण वाढेल. कुठलाही निर्णय घाईगडबडीत घेऊ नये. राजकारणातील व्यक्तीला यश.
कर्क – राहू बदल तितकासा अनुकूल नाही. कुटुंबात गैसमज वाढतील. संतती सुखात अडथळा.
इलेक्ट्रॉनिक (लॅपटॉप , मोबाइल बिघडणे किंवा चोरीला जाणे) वस्तूंची काळजी घेणे. वडीलधाऱ्या व्यक्तींच्या प्रकृतीची काळजी घेणे. वादविवाद टाळावा. पालकांच्या मनाविरुद्ध विवाह करू नये.
सिंह – फारसे लाभदायक नाही परंतु विध्यार्थ्याचे थिसीस किंवा संशोधन या काळात पूर्ण होण्याची शक्यता अधिक. सासुरवाडीतील वडीलधाऱ्या व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल तसेच स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.अचानक धनलाभाची शक्यता.
कन्या – चिंता वाढतील .जोडीदाराबरोबर वाद वाढतील.बुधाची उपासना करावी ,
व्यवसायात पार्टनर बरोबर बेबनाव होईल परंतु ज्या कार्यक्षेत्रात आपला दबदबा आहे तेथे आपली पत /मानसन्मान वाढेल. व्यवसाय तसेच इतर कार्यात वडीलधार्या/जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
तूळ – शत्रूंचा त्रास वाढेल, फसवणूक अनुभवास येईल,व्यवसायासाठी कर्ज घेऊ नये.परदेश गमनाचे योग (चांगल्या ट्रॅव्हल एजन्सीची निवड करावी),स्टॉक मार्केट मध्ये काळजीपूर्वक गुंतवणूक करावी,कुटुंबाशी वैमनस्य घेऊ नये. आजारी पडल्यास डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार करावे.आजोळच्या प्रॉपर्टीतून लाभ (आई कडील)
वृश्चिक – विनासायास/झटपट पैसे मिळवण्याच्या फंदात पडू नये,
काळजीपूर्वक गुंतवणूक करावी.विध्यार्थ्यांना मनासारखे कॉलेज किंवा विषय मिळण्याकरिता त्रास.मित्रांच्या जास्त आहारी जाऊ नये ,जादा कामे अंगावर घेऊ नये.
धनु – नवीन घर,वाहन तसेच घराचे नूतनीकरण असे योग,वडिलोपार्जित प्रॉपर्टीत वाढ ,विध्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी ,त्यासाठी परदेशगमनाचे योग विदेशात व्यापारात लाभ ,रेंगाळली कामे मार्गी लागतील ,आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
मकर – पराक्रम स्थानातील राहू मुळे यश ,कीर्ती वाढेल अंगभूत गुणांना वाव मिळेल. नवा व्यवसाय,नवी नोकरी, मनासारखे काम करण्याच्या संधी उपलब्ध होतील आर्थिक लाभ होईल,प्रवास वाढतील नवीन ओळखी होतील ,सामाजिक जीवनातील केलेल्या कार्याची दखल घेतील जाईल ,आत्मविश्वास वाढेल.
कुंभ – बोलण्यावर /जिभेवर नियंत्रण ठेवावे लागेल ,
आपल्या बोलण्याने कोणी दुखावले जाऊ नये याची काळजी घ्यावी लागेल. व्यवसायात उधारी देऊ नये, कुटुंबात धार्मिकता वाढेल,जोडीदाराकडून चांगली साथ लाभेल ,कुलदेवतेची उपासना करावी.
मीन – मानसिक गोंधळ वाढेल. प्रकृतीची काळजी घ्यावी,कुठल्याही गोष्टीच्या आहारी जाऊ नये,
जोडीदारासोबत वादविवाद वाढतील ,खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल,मोठ्या व्यक्तींचा आदर करावा, धनवृद्धीचे योग,शिवाची उपासना करावी.
– जितेश सावंत
के. पी. विशारद ,नक्षत्र सम्राट, वास्तू तज्ञ (Astro Vastu Consultant)
शेअर बाजार तज्ञ/ सायबर कायदा(cyber law) अभ्यासक
jiteshsawant33@gmail.com