घोडपदेव येथे मराठी माणसांच्या एकगठ्ठा मतदानामुळे शिवसेना ठाकरेचे रमाकांत रहाटे विजयी
मुंबई, दि १९
मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 208 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रमाकांत रहाटे आणि शिंदे सेनेचे विजय लिपारे हे रिंगणात होते. रमाकांत रहाटे हे गेले तीन टर्म या प्रभागात नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत.त्यांनी प्रभागात कामे देखील केलेली आहेत. त्यातच मराठी बहुल वस्ती असलेल्या या भागात ठाकरे यांना मनसेची साथ मिळाल्याने मराठी माणूस एकत्र आला. त्यातच शिंदे सेनेचे उमेदवार विजय दाऊ लिपारे हे त्यांच्या विरोधात उभे होते. त्यामुळे ही निवडणूक रहाटे आणि लिपारे या दोघात प्रामुख्याने झाली. या मध्ये कोण निवडून येणार या बाबत विभागत फार मोठ्या प्रमाणात चर्चा होती. कारण lipare यांचा देखील जनसंपर्क चांगला होता. तसेच त्यांना माजी आमदार यामिनी जाधव यांच्या सोबत संपूर्ण परिसर पिंजून काढला होता. तसेच आमदार निधी या विभागात देऊन सर्वांची कामे केली होती. तसेच लिपारे हे काम करण्यासाठी सर्वश्रुत होते. तसेच रात्री, अपरात्री देखील लोकांना रुग्णवाहिका, मोक्ष रथ आणि रुग्णालयात दाखल करण्याची कामे देखील त्यांनी विभागातील नागरिकांसाठी केली होती. त्यातच या प्रभागातील मनसेचे संजय नाईक यांचा देखील प्रभाव या प्रभागात मोठ्या प्रमाणात असून मनसे आणि शिवसेनेची युती झाल्यामुळे रमाकांत रहाटे यांना त्याचा खूप फायदा झाला. या ठिकाणी ठाकरे ब्रँड अगदी योग्य पद्धतीने चालला आणि शिवसेना ठाकरे सेनेचे रमाकांत रहाटे अगदी मोठ्या मताधिक्याने निवडून आले.KK/ML/MS