प्रभाग क्र.208 चे शिवसेना उमेदवार रमाकांत रहाटे यांच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि. १२
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे महायुतीचे प्रभाग क्रमांक 208 चे उमेदवार रमाकांत रहाटे यांच्या घोडपदेव भायखळा येथील पचायला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राहते यांनी प्रभागातील नागरिकांचे घरोघरी जाऊन प्रचार केला होता. यावेळेस प्रत्येक घरातील वयोवृद्ध महिलांनी रहाटे यांच्या आरती आणि ओवाळणी करून त्यांना शुभाशीर्वाद दिले. आम्ही शिवसेना शाखेच्या माध्यमातून नेहमी विवाहातील नागरिकांसाठी 24 तास उपलब्ध असतो. आम्ही वेळ काळ काहीच पाहत नाही. सामान्य नागरिकाला मदत करणे हे आमचे ध्येयधोरण आहे त्या धोरणानुसारच आम्ही आणि शिवसेना प्रत्येक घराघरात पोहोचली आहे. नागरिकांनी मला गेली अनेक वर्ष नगरसेवक म्हणून निवडून दिले आहे त्यामुळे मला प्रभागातील अनेक समस्यांची जाणीव आहे. त्यातील अनेक समस्या मी सोडवले असून ज्या समस्या राहिल्या आहेत ते येणारे का सोडवणार अशी ग्वाही शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि प्रभाग क्रमांक 208 चे उमेदवार रमाकांत रहाटे यांनी दिली. या प्रचार सभेमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी, महिलांनी आणि युवकांनी सहभाग घेतला होता. तसेच विभागातील युवकांनी रहाटे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीचे देखील आयोजन केले होते.KK/ML/MS