राघवदास लाडू
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१.५ तास
लागणारे जिन्नस:
(१) अर्धा किलो खवा
(२) पाऊण किलो पिठीसाखर
(३) दीडशे ते दोनशे ग्रॅम बारीक रवा (अगदी प्रमाणात घ्यायचा असेल तर पावणेदोनशे ग्रॅम)
(४) सव्वाशे ग्रॅम तूप (त्यापेक्षा थोडे जास्तच घेऊन ठेवावे)
(५) दूध (कृतीत सांगितल्यानुसार; एखादा कप पुरेसा व्हावा)
(६) दोन-तीन ग्रॅम केशर
(७) सव्वाशे ग्रॅम बदाम (तोडलेले)
(८) सव्वाशे ग्रॅम बेदाणे
(९) पाच ग्रॅम वेलदोड्याची पूड
क्रमवार पाककृती:
‘सूपशास्त्र’ हे रामचंद्र सखाराम गुप्ते यांनी लिहिलेलं आणि रावजी श्रीधर गोंधळेकर यांनी छापलेलं मराठीतलं आद्य पाकपुस्तक. ‘किताबकल्हई’ ह्या उपक्रमांतर्गत गेल्या वर्षी त्याचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. त्यात प्रस्तावना, टिपा, विश्लेषण, अशी बरीच मजा नव्याने घातलेली आहे. ती वाचायला मजा आली. परंतु पाकपुस्तक ते पाकपुस्तक. मग त्यातलं काहीतरी करून बघायला हवं. पण हा योग काही येत नव्हता. शेवटी काल ‘किचन कल्लाकार’ ह्या झीवरच्या कार्यक्रमात अभिजीत सावंतला नारायणदास लाडू करायला लावले, आणि मला हे राघवदास लाडू आठवले. मग लगेच आज करून टाकले. ती ही कृती.
(१) सगळा रवा घेऊन त्यात रव्याचे मुटकुळे होतील, इतपत तूप चोळावे.
(२) खललेले केशर निम्मे घेऊन ते दुधात मिसळून त्या दुधात वरील रवा कालवावा. घट्ट भगरा होईल इतपतच दूध घ्यावे. पातळ करू नये. (चमच्या-चमच्याने घालावे.)
दूध रव्यास लावत असतानाचा फोटो. केशराचा रंग रव्यास छान लागतो.
(३) सव्वाशे ग्रॅम तूप घेऊन त्यात वरील रवा तळावा / भाजावा. (प्रमाणात घेतल्यास मस्त होतो, तरीही कोणाला तूप कमी करायचे असल्यास आधी कमी घेऊन, नंतर कोरडे वाटल्यास लाडू वळताना थोडे वरून घालता येते. ह्यासाठी तूप घरचे घेतल्यास उत्तम.)
(४) चांगला खरपूस रंग आणि वास आल्यावर त्यात सर्व खवा घालावा. पुन्हा ५-१० मिनिटे भाजून चुलीवरून उतरवावा. थंड झाल्यावर त्यात सगळी पिठीसाखर घालावी. (ह्यातही चवीनुसार, आवडीनुसार कमी-जास्त करू शकता. माझ्या मते एकदम परफेक्ट प्रमाण कृतीत आहे.)
राघवदास लाडू तयार!
ML/ML/PGB
28 May 2024