गुजरात दंगलीवरील माहितीपटा वरून जेएनयूमध्ये राडा…

 गुजरात दंगलीवरील माहितीपटा वरून जेएनयूमध्ये राडा…

नवी दिल्ली, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बीबीसीने नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीवर एक डॉक्युमेंट्री प्रसिद्ध केली. ती जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) दाखवण्यावर काल विद्यापीठ आवारात दंगल झाली.Rage in JNU over documentary on Gujarat riots…

बीबीसीने ‘इंडिया: द मोदी प्रश्न’ या माहितीपटात गुजरात दंगलीतील नरेंद्र मोदींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मोदी सरकारने मोठी कारवाई करत यूट्यूबवर बीबीसी डॉक्युमेंट्री शेअर करणारे व्हिडिओ ब्लॉक केले आहेत. यासोबतच बीबीसी डॉक्युमेंटरीची यूट्यूब लिंक शेअर करणारे ट्विटही ब्लॉक करण्यात आले आहेत. पण, ही करूनही डॉक्युमेंट्री लीक झाली आहे.

या ना त्या वादामुळे चर्चेत राहणाऱ्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरू (जेएनयू) विद्यापीठात हा माहितीपट दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे नवीन वाद उफाळला आहे. जेएनयू विद्यार्थी संघटनेने मंगळवारी रात्री ९ वाजता माहितीपट दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना अपयश आले. जेएनयू प्रशासनाने हे आयोजन रोखले.

विद्यापीठातील वीजपुरवठा आणि इंटरनेट सेवा खंडित केल्याचा आरोप एका संघटनेने केला आहे. त्यामुळे विद्यापीठात काहीसा गोंधळ उडाला आणि दोन गट एकमेकां समोर आले. दरम्यान, अभाविपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचे जेएनएसयू संघटनेने म्हटले आहे. या घटनेमुळे वाद होण्याची शक्यता आहे.

अधिकाऱ्यांनी डॉक्युमेंटरीची चौकशी केली

दरम्यन, परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयासह अनेक मंत्रालयांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी डॉक्युमेंटरीची तपासणी केली आहे आणि त्यात प्रशासनाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या विश्वासार्हतेला कलंक असल्याचे आढळून आले आहे. तसंच विविध भारतीय समुदायात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न सांगितला आहे. सूत्रांनी सांगितले की माहितीपट भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळले आहे.

ML/KA/PGB
25 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *