राधानगरी धरणातून 1400 क्युसेक विसर्ग, ७४ बंधारे पाण्याखाली

 राधानगरी धरणातून 1400 क्युसेक विसर्ग, ७४ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यातील राधानगरी धरणात 5.08 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा 36 फुटावरून वाहत आहे. तर इशारा पातळी 39 इतकी आहे.तर धोका पातळी 43 फूट इतकी आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कता इशारा दिला आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ – रुकडी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड – हल्लारवाडी, वेदगंगा नदीवरील- चिंचोली – माणगांव, हिरण्यकेशी नदीवरील – साळगांव, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, कासारी नदीवरील- येवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे – बाजार भोगाव, वारणा नदीवरील -चिंचोली, भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे – सरकारी कोगे, कुंभी नदीवरील- कळे, शेनवडे, मांडुकली – सांगशी असे एकूण 74 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 5.08 टीएमसी, तुळशी 2.04 टीएमसी, वारणा 21.50 टीएमसी, दूधगंगा 11.93 टीएमसी, कासारी 1.94 टीएमसी, कडवी 2.01 टीएमसी, कुंभी 1.47 टीएमसी, पाटगाव 2.80 टीएमसी, चिकोत्रा 0.69 टीएमसी, चित्री 1.41 टीएमसी, जंगमहट्टी 1.19 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.07 टीएमसी, सर्फनाला 0.31 टीएमसी आणि कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 22.5 फूट, सुर्वे 22 फूट, रुई 51.2 फूट, इचलकरंजी 48.7 फूट, तेरवाड 44 फूट, शिरोळ 34.6 फूट, नृसिंहवाडी 31 फूट, राजापूर 20.10 फूट तर नजीकच्या सांगली 10 फूट आणि अंकली 12 फूट अशी आहे.

ML/ML/PGB 20 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *