पुण्यात होणार ‘राडा’ – पहिला मराठी पॉप कल्चर फेस्टिव्हल
पुणे, दि. 27 : ‘राडा २०२६’ हा राज्यातील पहिलाच मराठी पॉप कल्चर फेस्टिव्हल पुण्यात रंगणार आहे. भाडीपा (भारतीय डिजिटल पार्टी) प्रस्तुत हा दोन दिवसीय उत्सव २८ आणि २९ मार्च २०२६ रोजी बालेवाडी येथील ‘द ऑर्किड हॉटेलमध्ये प्रथमच आयोजित करण्यात येत आहे. या फेस्टिव्हलमध्ये अवधूत गुप्ते, प्राजक्ता कोळी, डीजे क्रेटेक्स, यंग डीएसए, सृष्टी तावडे, यशराज मुखाटे आणि नील साळेकर यांसारख्या लोकप्रिय कलाकारांचा सहभाग असणार आहे. तसेच ‘कास्टिंग काउच’ फेम अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी यांचीही उपस्थिती असणार आहे.
या उत्सवात मोठ्या स्टेजवरील परफॉर्मन्सेस, लाईव्ह अॅक्ट्स आणि विचारमंथनात्मक चर्चांद्वारे मराठी डिजिटल विश्वाचा अनुभव प्रत्यक्ष घेता येणार आहे. कलाकार आणि चाहत्यांना एकाच मंचावर संवाद साधण्याची अनोखी संधी मिळणार आहे.
भाडीपाचे सह-संस्थापक सारंग साठ्ये आणि पॉला मॅकग्लिन यांनी सांगितले की, “जग आता मराठी टॅलेंटकडे लक्ष देत आहे. पण आपल्या यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी आपल्याकडे व्यासपीठ नव्हते. राडा हाच तो प्रयत्न आहे, जो आपल्या संस्कृती घडवणाऱ्या लोकांना एकत्र आणतो. आपल्या मातीतून उगवलेल्या पॉप कल्चरला पुढे नेणाऱ्या या चळवळीचा भाग होणे खूपच खास आहे आणि यासाठी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यापेक्षा योग्य ठिकाण कोणते?”
SL/ML/SL