रेसकोर्स मैदानावर धम्मदिक्षा घेण्याचा संकल्प
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): येत्या १६ डिसेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्सवर धम्मदीक्षा देण्याचा संकल्प करण्यात आला असून त्यासाठी आयोजित धम्मदीक्षा समारोहास बौध्द धम्मगुरु दलाई लामांसह जगभरातील बौध्द नेत्यांना निमंत्रित केल्याची माहिती आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
रामदास आठवले म्हणाले भारतीय संविधानाचे शिल्पकार, बोधीसत्व महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे 14 ऑक्टोंबर 1956 रोजी बौध्द धम्माची दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी मुंबईत धम्मदीक्षा सोहळा आयोजित करण्याचा विचार केला होता. त्यासाठी त्यांनी 16 डिसेंबर 1956 रोजी मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्सवर धम्मदीक्षा सोहळा आयोजित करण्याचा संकल्प जाहीर केला होता. मात्र त्यापूर्वीच 6 डिसेंबर 1956 रोजी महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे त्यांचा तो संकल्प अधुरा राहिला.
डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचा अधुरा राहिलेला तो संकल्प पूर्ण करण्यासाठी येत्या 16 डिसेंबर 2023 रोजी मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स येथे भव्य ऐतिहासिक समारोहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आठवले यांनी रेडिओ क्लब अपोलो बंदर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या ऐतिहासिक ठरणाऱ्या समारोहाचे आयोजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर धम्मदीक्षा समारोह समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या सोहळयास जागतिक बौद्ध धम्मगुरु दलाई लामा श्रीलंकेचे प्रधानमंत्री दिनेश गुणवर्धने; थायलँड चे प्रधान मंत्री श्रेठ्ठा थविशीन;भूतान च्या राजकुमारी अशी केसांग वांगमो वांगचुक;
कंबोडिया; व्हिएतनाम; थायलँड सह जगभरातील बौद्ध नेते उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित केल्याची माहिती त्यांनी दिली..
या धम्म दीक्षा समारोहास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; उपमुख्यमंत्री अजित पवार ; सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या बौद्ध धम्म दिक्षा सोहळ्यास देशभरातील सर्व बौध्द ; आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
15 आणि 16 डिसेंबर असा दोन दिवस धम्म दीक्षा समारोह मुबाईत होत असून 15 डिसेंबर रोजी वरळी येथील सरदार वल्लभ भाई पटेल नॅशनल स्पोर्ट्स स्टेडियम च्या डोम मध्ये कार्यक्रम होणार असून 16 डिसेंबर 2023 रोजी महालक्ष्मी रेसकोर्स वर भव्य बौद्ध धम्म दीक्षा समारोह आयोजित करण्यात आला आहे अशी महिती रामदास आठवले यांनी दिली.
आपसांतील मतभेद आणि राजकीय गटबाजी बाजुला ठेवुन केवळ बौध्द म्हणून आणि डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून बौध्द उपासक म्हणून आपण 16 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या समारोहास उपस्थित राहायचे आहे. मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स वर धम्मदिक्षा सोहळा आयोजित करण्याचा महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचा ऐतिहासीक संकल्प जगा समोर ठेऊन धम्माचा प्राचार आणि प्रसार करण्यासाठी या कार्यक्रमांचे नियोजन असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी सर्वांनी भेदभाव, गटबाजी आणि राजकारण बाजुला ठेवुन बौद्ध अनुयायी म्हणून एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर धम्मदीक्षा समारोह समिती तर्फे रामदास आठवले यांनी केले आहे.
ML/KA/PGB 11 Nov 2023