रब्बी हंगामाच्या पेरणीला वेग ; गहू, हरभरा आणि तेलबियांच्या पेरणीलापसंती.
वाशिम, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशिम जिल्ह्यात यंदा खरीप हंगामातील सोयाबीनचे पावसाने दडी मारल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भिस्त रब्बीतील पिकावर आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीला सुरवात झाली असून यंदा कृषी विभागानं रब्बी हंगामात १ लाख १० हजार हेक्टरवर पेरणी करण्याचे नियोजन केले आहे.
जिल्ह्यात सध्याचे गव्हाचे क्षेत्र ३४ हजार हेक्टर असून यंदाच्या रब्बी हंगामात ३५ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी करण्याचे नियोजन आहे. तसेच सध्या हरभरा पिकाचे क्षेत्र ८२ हजा हेक्टर असून रब्बी हंगामात यात घट होऊन 75 हजार हेक्टरवर पेरणी होणार आहे. सोबतच मोहरी, करडई आणि सूर्यफुल या तेलबियांनाही यावर्षीच्या हंगामात शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे.
ML/KA/PGB 20 Oct 2023