दोन वर्षांच्या खंडानंतर रा स्व संघ शिक्षा वर्ग सुरू
नागपूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षण प्रणालीतील महत्त्वपूर्ण संघ शिक्षा वर्गाचे (तृतीय वर्ष) नागपुरातील रेशीमबाग येथील स्मृतिमंदिर परिसरात आयोजन करण्यात आले असून या संघ शिक्षा वर्गाला आजपासून सुरुवात झालेली आहे.Ra Swa Sangh Shiksha class begins after two years of hiatus
कोरोनाच्या स्थितीमुळे मागील दोन वर्षे शिक्षा वर्गाचे आयोजन झाले नव्हते. परंतु आता स्थिती नियंत्रणात असल्याने या वर्षी दुसऱ्यांदा सामान्य तृतीय वर्ष वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी रेशीमबाग येथील डॉ.हेडगेवार स्मृति भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात वर्गाचे उदघाटन झाले.
तृतीय वर्ष वर्गात देशभरातील सर्वच राज्य व प्रांतांमधून शिक्षार्थी स्वयंसेवक सहभागी होतील. या वर्गात सुमारे ७०० स्वयंसेवक सहभागी झालेले आहेत.
ML/KA/PGB
14 Nov .2022