सर्वसामान्यांकडून काम करून घेण्याची ताकद रा स्व संघात

 सर्वसामान्यांकडून काम करून घेण्याची ताकद रा स्व संघात

नागपूर, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय सवयंसेवक संघामध्ये सामान्य लोकांकडून असामान्य गोष्टी करवून घेण्याची ताकद आहे असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षारंभ आणि हृदयरोग वैद्यकीय सेवा केंद्राच्या उदघाटन समारंभामध्ये सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या खापरी इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुप्ता, उपाध्यक्ष पराग सराफ, कार्यकारिणी सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटल गेली 50 वर्षे नि:स्वार्थपणे गरजू आणि गरिबांची सेवा करत आहे. अडचणीच्या काळामध्ये देखील या संस्थेने सेवेचे कार्य सुरू ठेवले. या संघटनेने देशातील प्रत्येक भागात आपत्तीच्या वेळी सेवाकार्य केले असे ते म्हणाले. बाळासाहेब देवरस यांच्या प्रेरणेने हे उदात्त कार्य सुरू झाले. त्यानंतर नानासाहेबांनी मेहनतीने ही संस्था उभी केली. तसेही संघाच्या विचारांमध्ये सामान्य माणसांना असामान्य गोष्टी करायला लावण्याची ताकद आहे असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

आज अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच शिक्षण, औषध आणि कमाई याही मूलभूत सुविधा झाल्या आहेत. आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य यांसारख्या लोक
कल्याणकारी योजना यशस्वी करण्यात अशा संस्था महत्त्वाची भूमिका बजावतील. मला विश्वास आहे की स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पिटलचे 250 खाटांचे हॉस्पिटल सुरू करण्याचे उद्दिष्ट देखील लवकरच पूर्ण होईल. कारण नि:स्वार्थपणे सेवा करणाऱ्यांना कधीही कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

Nagpur #Maharashtra #Healthcare #Hospital

ML/KA/PGB
18 Nov 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *