आर. माधवनच्या लेकाने जिंकली पाच सुवर्णपदकं

 आर. माधवनच्या लेकाने जिंकली पाच सुवर्णपदकं

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आर. माधवन याचा मुलगा वेदांत याने स्विमिंगमध्ये मलेशियन इन्व्हिटेशन एज ग्रूप चॅम्पियनशिपमध्ये देशासाठी ५ सुवर्ण पदक जिंकत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. स्टारकिड असूनही वेगळी अभिनयक्षेत्रात न येता वेगळी वाट निवडून यश कमावणाऱ्या वेदांतचे यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. आर. माधवन देखील आपली अभिनयातील घोडदौड कायम ठेवत मुलाच्या यशस्वीतेसाठी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो.

आर. माधवनने एक पोस्ट आणि काही फोटो शेअर करत मुलाच्या कामगिरीची माहिती दिली आहे. “देवाच्या कृपेने आणि तुमच्या सर्व शुभेच्छांनी वेदांतने क्वालालंपूर येथे शनिवार व रविवारी आयोजित मलेशियन इन्व्हिटेशन एज ग्रूप चॅम्पियनशिप, 2023 मध्ये भारतासाठी 5 सुवर्ण (50 मी, 100 मी, 200 मी, 400 मी आणि 1500 मी) पदकं जिंकली. मी खूप आनंदित आणि कृतज्ञ,” असे माधवनने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

वेदांतने एका मुलाखतीत म्हटले होते की, मला माझ्या वडिलांच्या सावलीत राहायचे नव्हते. मला स्वतःचे नाव कमवायचे होते. मला फक्त आर माधवनचा मुलगा व्हायचे नाही. माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी माझ्यासाठी खूप त्याग केले आहेत, दुबईला शिफ्ट होणे हा त्याचाच एक भाग असल्याचे वेदांतने सांगितले होते.

वेदांतने याआधी देखील भोपाळमध्ये झालेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स 2023 मध्ये पाच सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांवर स्वतःचे नाव नोंदवले.
SL/KA/SL
17 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *