औषधांच्या पाकिटावर क्यूआर कोड बंधनकारक
मुंबई,दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बनावट औषधांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुढील वर्षांपासून औषधाबाबतची माहिती असलेले बारकोड औषधांच्या पाकिटावर लावणे अनिवार्य होणार आहे. QR code Mandatory on medicine packet
1 ऑगस्ट 2023 पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या वैशिष्ट्यपूर्ण क्यूआर कोडमध्ये औषधाबाबतची सर्व माहिती असणार आहे. यामध्ये उत्पादनाचे आयडेंडिटीफिकेशन कोड, औषधाचे नाव आणि जेनेरिक नाव, ब्रॅण्डचे नाव, उत्पादकाचे नाव आणि पत्ता, बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख, औषधाची मुदत, उत्पादकाचा परवाना क्रमांक आदी माहितीचा समावेश असणार आहे.
औषधांच्या पाकिटांवर बारकोड अनिवार्य करण्यासाठी केंद्र सरकारने मागील वर्षी Drugs and Cosmetic Rules, 1945 कायद्यात दुरुस्ती करत त्यात अनुसूची एच2 (Schedule H2) समाविष्ट केले आहे.
SL/KA/SL
4 Dec. 2022