चक्क फ्लॅटमध्ये पाळले अजगर, सरडे, साप आणि चिंपांझी

 चक्क फ्लॅटमध्ये पाळले अजगर, सरडे, साप आणि चिंपांझी

डोंबिवली, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डोंबिवलीमधून वन्यजीवांवरील अत्याचाराची एक अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत वन विभागाने मोठी कारवाई केली असून प्रतिबंधित विदेशी वन्यजीव जप्त केले आहेत. या छाप्यात कासव, साप, अजगर, एग्वाणा (सरडा) यांसारख्या वन्यजीवांचा समावेश आहे.

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधून आलेल्या निनावी फोनमुळे ठाणे वन अधिकाऱ्यांना डोंबिवली येथील पलावा सिटी येथील तीन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये बेकायदेशीररित्या प्राणी पाळलं जात असल्याचं समजलं. यावेळी पिंजऱ्यात बंदिस्त चिंपाझी माकड होता. हे माकड सहसा बोर्निओ आणि सुमात्रा च्या जंगलात आढळतात आणि एक लुप्त होत असललेली प्रजाती म्हणून सूचीबद्ध आहे.

कल्याण वनक्षेत्राच्या अखत्यारितील नियतक्षेत्र पिसवलीमधील डोंबिवली जवळील एक्स्पिरिया मॉलसमोरील पलवा सिटी येथील एका इमारतीत आठव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये वनविभाग व राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस व मानपाडा पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत या वन्यजीवांना ताब्यात घेण्यात आलं. घरात कासव, साप, अजगर, एग्वाणा (सरडा) यांच्यासह चिंपाझी माकडदेखील होतं. घराचा मालक फरार असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन विभागाला एका खबऱ्याच्या माध्यमातून ही माहिती मिळाली होती.

कारवाई दरम्यान संबंधित आरोपी घटनास्थळी आढळून आला नाही. जप्त करण्यात आलेले वन्यजीव स्थानिक स्वयंसेवी संस्था बिरसा मुंडा, कल्याण यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सुपूर्द करण्यात आले आहेत. या प्रकरणात पंचनामा व आवश्यक कागदपत्रे तयार करून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

SL/ML/SL

13 Nov. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *