PVR INOX ने सुरू केला ‘dine-in cinema’

 PVR INOX ने सुरू केला ‘dine-in cinema’

बंगळुरू, दि. ८ : PVR INOX ने बंगळुरूमध्ये भारतातील पहिला ‘डाइन-इन सिनेमा’ सुरू केला असून, चित्रपट पाहण्याचा अनुभव आता स्वादिष्ट जेवणासह अधिक आल्हाददायक होणार आहे.

PVR INOX ने बंगळुरूच्या M5 ECity Mall मध्ये भारतातील पहिला ‘डाइन-इन सिनेमा’ सुरू केला आहे. हा नवीन फॉरमॅट पारंपरिक चित्रपटगृहाच्या संकल्पनेला छेद देतो आणि प्रेक्षकांना चित्रपट पाहतानाच त्यांच्या जागेवर बसून शेफ-क्युरेटेड जेवणाचा आस्वाद घेण्याची सुविधा देतो. विशेष म्हणजे, या सिनेमा अनुभवासाठी चित्रपटाचे तिकीट घेणे अनिवार्य नाही; प्रेक्षक टेबल बुक करून फक्त जेवणाचा आनंद घेऊ शकतात.

या मल्टिप्लेक्समध्ये Crosta, Cine Café, Steamestry, Wokstar, Frytopia, Dogfather आणि Local Street यांसारख्या विविध इन-हाउस फूड ब्रँड्स उपलब्ध आहेत. यातून पिझ्झा, बर्गर, सॅंडविच, हॉटडॉग, स्थानिक पदार्थ यांचा समावेश असलेले गौरमेट जेवण दिले जाते. ₹490 मध्ये दोन सीट्स आणि ₹990 मध्ये चार सीट्स बुक करता येतात, तर जेवणाचे बिल वेगळे असते.

PVR INOX चे व्यवस्थापकीय संचालक अजय बिजली यांनी सांगितले की, “आम्ही सिनेमा अनुभवाला एक नवीन आयाम देत आहोत. हे ठिकाण केवळ चित्रपट पाहण्याचे नव्हे, तर जीवनशैलीचे केंद्र बनवण्याचा आमचा उद्देश आहे.” या ठिकाणी Dolby Atmos, DTS:X, Dolby 7.1 सराउंड साउंड आणि 4K Laser Projection सारखी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सोय आहे. Big Pix Auditorium मध्ये RealD 3D सह मोठ्या स्क्रीनवर उच्च दर्जाचे दृश्य अनुभव मिळतो.

या संकल्पनेतून PVR INOX ने फूड आणि इव्हेंट्सच्या माध्यमातून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. FY25 मध्ये कंपनीने ₹1,733.5 कोटींचे F&B उत्पन्न मिळवले असून, येत्या काळात अशा आणखी 4-5 डाइन-इन सिनेमा सुरू करण्याची योजना आहे. यासाठी प्रत्येक थिएटरमध्ये सुमारे ₹3 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.

हा डाइन-इन सिनेमा कॉर्पोरेट इव्हेंट्स, कॉमेडी शो, लाइव्ह कॉन्सर्ट्स यांसाठीही वापरता येणार आहे. यामुळे चित्रपटगृहाचा वापर नॉन-टिकिट मॉनेटायझेशन साठीही होणार आहे. PVR INOX ने Devyani International सोबत भागीदारी करून मॉल-बेस्ड फूड कोर्ट्स सुरू करण्याचीही योजना आखली आहे.

SL/ML/SL 8 Oct. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *