राज्य विधिमंडळात सादर झाल्या ५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

 राज्य विधिमंडळात सादर झाल्या ५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

नागपूर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात एकूण रु. 55,520.77 कोटींच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर करण्यात आल्या आहेत.
यापैकी रु.19,244.34 कोटीच्या अनिवार्य, रु.32,792.81 कोटींच्या कार्यक्रमांतर्गत आणि रु.3,483.62 कोटींच्या रकमा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवणी मागण्या आहेत.

रु. 55,520.77 कोटींच्या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा रु. 48,384.66 कोटी एवढा आहे असे वित्तमंत्र्यानी स्पष्ट केले आहे. या पुरवणी मागण्यांमध्ये महत्वाच्या आणि मोठ्या पुरवणी मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :-
(रुपये कोटीत)
अ.क्र. बाब. रक्कम

  1. जल जीवन मिशन (सर्वसाधारण, अनुसूचित जाती घटक) 4283.00

2 एकत्रित प्रोत्साहन योजनेअंतर्गत लघु, मध्यम, मोठया उद्योग घटकांना , विशाल प्रकल्पांना विविध प्रोत्साहनपर रक्कम
3000.00

3 महानगरपालिका क्षेत्रात पायाभूत सुखसोयीच्या विकासासाठी , नगरपालिका नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान व रस्ता अनुदान तसेच नगरोत्थान
3000.00

4 प्रधानमंत्री पीक विमा योजना – विमा हप्ता
2768.12

5 राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका तसेच अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन
2728.41

6 केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी 50 वर्ष कालावधीचे बिनव्याजी कर्ज 2713.50

7 राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा व इतर मार्ग योजना अंतर्गत रस्ते बांधकाम, रस्ते व पुल दुरूस्ती 2450.00

8 श्रावण बाळ राज्य निवृत्तीवेतन योजना
2300.00

9 आशियाई विकास बँकेकडून प्राप्त होणारे कर्ज
2276.00

10 नमो शेतकरी महासन्मान निधी 2175.28

11 यंत्रमाग, वस्त्रोद्योग व कृषीपंप ग्राहकांना विजदरात सवलत
1997.49

12 ग्रामिण स्थानिक स्वराज्य संस्थाच्या बळकटीकरणासाठी – 15 केंद्रीय वित्त आयोगाचा निधी 1918.35

13 नाबार्डचे कर्ज, हुडको, व REC लि.कडून घेतलेल्या कर्जाची व व्याजाची परतफेड 1439.00

14 मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती- इतर मागासवर्गीय, विजा.भज व विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांकरिता
1046.02

15 राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सवलतीची प्रतिपूर्ती 1000.00

16 मोदी आवास घरकुल योजना – इतर मागासवर्गीय लाभार्थी 1000.00

17 मुंबई मेट्रो – मुद्रांक शुल्कांचे प्रदान 1000.00

18 अन्न धान्य व्यवहारांतर्गत तूट
997.05

19 स्वयंसहाय्यता गटांना फिरता निधी 996.60

20 पोलीस विभागातील कार्यालयीन इमारतींचे बांधकाम व निवासी अनिवासी इमारत दुरूस्ती
698.66

21 संजय गांधी निराधार अनुदान योजना 687.00

22 विविध पाटबंधारे विकास महामंडळांना विविध योजनांसाठी भांडवली अंशदान
600.00

23 अल्पसंख्याक बहुल ग्रामीण व नागरी क्षेत्रात मुलभूत पाय़ाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी
500.00

या पुरवणी मागण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ज्या विभागाच्या पुरवणी मागण्या अंतर्भूत झालेल्या आहेत, ते विभाग पुढीलप्रमाणे :-

अ.क्र. विभाग रक्कम (रुपये कोटीत)

  1. सार्वजनिक बांधकाम विभाग 5492.38
  2. कृषी व पदुम विभाग
    5351.66
  3. नगर विकास विभाग
    5015.12

4.उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग 4878.67

  1. ग्रामविकास विभाग
    4019.18

6.पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग 3555.16

  1. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
    3495.37

8.शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 3476.77

  1. इतर मागास बहुजन कल्याण विभाग 3377.62
  2. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग
    3081.29

11.गृह विभाग 2952.54

  1. आदिवासी विकास विभाग. 2058.16
  2. सार्वजनिक आरोग्य विभाग. 1366.99
  3. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
    1176.96
  4. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
    999.72
  5. महसूल व वन विभाग
    787.12
  6. जलसंपदा विभाग
    751.70

18 उच्च व तंत्र शिक्षण विभाग 736.88

  1. अल्पसंख्याक विकास विभाग. 626.81
  2. नियोजन विभाग
    600.00
  3. विधी व न्याय विभाग
    408.47
  4. महिला व बाल विकास विभाग 375.29

23 वित्त विभाग 316.15

ML/KA/PGB 7 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *