पिंपरी चिंचवडमध्ये लावलेला शास्ती कर पूर्ण माफ
नागपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पिंपरी चिंचवडमध्ये Pimpri Chinchwad अनधिकृत बांधकामांसाठी आकारण्यात आलेला शास्तीकर पूर्ण माफ केला जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.Punitive tax levied in Pimpri Chinchwad is completely waived
याप्रकरणी अनेक न्यायालयीन बाबी आहेत त्यांना विचारात घेऊन, त्यांना अधीन राहूनच हे करण्यात येईल, आता केवळ मूळ कराचीच वसूली केली जाईल , बांधकामे नियमित करण्याची कारवाई करण्यात येईल असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तेही न्यायालयीन आदेशाना अधीन राहून केलं जाईल असं सांगितलं, आज अस्तित्वात आहेत त्यांनाच हे लागू आहे , पालिकेने satellite मॅपिंग करून ठेवावे, त्यानुसारच ते नियमित केलं जाईल , नंतरच्या अनधिकृत बांधकामांसाठी हे लागू असणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
ML/KA/PGB
21 Dec .2022