सार्वजनीक क्षेत्रातील या बँकेवर RBI कडून दंडात्मक कारवाई

मुंबई, 03 जून (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या इंडियन ओव्हरसीजवर RBI ने कठोर दंडात्मक कारवाई केली आहे. आरबीआयने या बँकेला २.२० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. उत्पन्नाच्या निर्धारणासंबंधित नियमांचं पालन न केल्याने आणि अन्य नियामकीय पालनातील त्रुटींमुळे इंडियन ओव्हरसिज बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे. महत्त्वपूर्ण बाब म्हणजे RBI ने कारवाई केली असली तरी इंडियन ओव्हरसीजच्या ग्राहकांवर यामुळे कोणताही परिणाम होणार नाही. कारण आरबीआयने बँकेवर नियमांचं पालन न केल्याने कारवाई केली आहे. अशा परिस्थितीत बँकेच्या सेवेवर कुठलाही परिणाम होणार नाही.
आरबीआयने या कारवाईबाबत सांगितले की, ही कारवाई विनियामक अनुपालनामधील कमतरेवर आधारित आहे. तसेच बँकेकडून आपल्या ग्राहकांसोबत करण्यात आलेल्या कुठल्याही देवाणघेवाण करारांच्या वैधतेशी त्याचा काहीही संबंध नाही.
आरबीआयकडून ३१ मार्च २०२१ रोजी बँकेच्या पर्यवेक्षी मूल्यांकनासाठी वैधानिक निरीक्षण त्याची वित्तीस स्थितीसंदर्भात देण्यात आला आहे. चेन्नईस्थित बँक आपल्या आरक्षित कोषामध्ये २०२०-२१साठी घोषित लाभाच्या २५ टक्क्यांच्या बरोबर रकमेचं किमान अनिवार्य हस्तांकरण करण्यामध्ये अपयशी ठरला होता.
डिपॉझिट इंश्योरन्स अँड क्रेडिट गॅरंट कॉर्पोरेशन इंश्योरन्स स्कीम अंतर्गत बँकांमध्ये जमा ५ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेचा विमा होतो. त्यामुळे बँक दिवाळखोरीत गेली किंवा तिचं लायसन्स रद्द झालं तर ग्राहकांना एवढी रक्कम बुडण्याची भीती नसते. डीआयसीजीसी, रिझर्व्ह बँकेची सब्सिडियरी आहे. ती बँकेमध्ये जमा रकमेवर इंशोरन्स कव्हर उपलब्ध करून देते.
SL/KA/SL
3 June 2023