पुणे विद्यापीठाची रया गेली, २३८ प्राध्यापकांची पदे रिक्त

 पुणे विद्यापीठाची रया गेली, २३८ प्राध्यापकांची पदे रिक्त

पुणे, दि. १२ : देशभरात प्रसिद्ध असलेल्या पुणे विद्यापीठामध्ये प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याने विद्यापीठाची गुणवत्ता धोक्यात आली आहे. राज्य सरकारची प्राध्यापक भरतीची प्रक्रिया रखडल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या एकूण ३८४ पदापैंकी २३८ प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. सध्या विद्यापीठात फक्त १० प्राध्यापक कार्यरत आहेत. या रिक्त पदांमुळे पुणे विद्यापीठातील शैक्षणिक घडामोडी आणि संशोधनासाठी लागणारी इकोसिस्टीम कोलमडली असून, विद्यापीठाचे देश पातळीवरील मानांकन खाली घसरले आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ) सर्वसाधारण गटात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ३७व्या क्रमांकाहून थेट ९१ व्या क्रमांकावर घसरण झाली.

विद्यापीठात प्राध्यापकांच्या ३८४ जागा मंजूर असून, त्यापैकी केवळ १४६ प्राध्यापक कार्यरत आहेत. निम्म्यापेक्षा अधिक म्हणजे २३८ जागा रिक्त आहेत. रिक्त पदांची संख्या गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ही पदे भरण्यासाठीची कार्यवाही उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून संथ गतीने सुरू आहे. त्यातही १११ पदे भरण्याचीच मंजुरी देण्यात आली आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *