पुणे-नागपूर मार्गावरील ‘या’ गाड्या तब्बल 22 दिवस रद्द
पुणे, दि. ८ : पुणे विभागातील दौंड-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामामुळे विदर्भ आणि मराठवाड्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. ४ जानेवारी ते २५ जानेवारी २०२६ या २२ दिवसांच्या कालावधीत ३० हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या असून काहींचे मार्ग बदलले आहेत. दौंड-काष्टी दरम्यान ‘प्री-नॉन इंटरलॉकिंग’ आणि ‘नॉन-इंटरलॉकिंग’चे तांत्रिक काम सुरू असल्याने पुणे-नागपूर गरीब रथ, पुणे-अमरावती एक्सप्रेस, पुणे-अजनी हमसफर, अजनी-पुणे हमसफर, पुणे-नागपूर एक्सप्रेस, निझामाबाद-पंढरपूर एक्सप्रेस तसेच पुणे-दौंड-बारामती DEMU गाड्या प्रभावित झाल्या आहेत.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी अधिकृत वेबसाईट किंवा हेल्पलाईनवर गाड्यांची स्थिती तपासण्याचे आवाहन केले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील रेल्वेचा वेग वाढून प्रवासाचा वेळ कमी होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
SL/ML/SL