पुणे मनपाचा मंगेशकर रुग्णायाला इशारा, दोन दिवसांत २२ कोटी भरा नाहीतर…

पुणे, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला आता पुणे महानगर पालिकेने सज्जड दम दिला आहे. . तनिषा भिसे या तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर मंगेशकर रुग्णालयाचे विविध गैरप्रकार समोर येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे मंगेशकर रुग्णालयाने पुणे महापालिकेचा तब्बल 27 कोटींचा कर थकवला आहे. आता पुणे महापालिकेने रुग्णालय प्रशासनाला एक नोटीस पाठवली आहे. त्यात त्यांनी 2 दिवसात 22 कोटींचा कर भरण्याचा आदेश मंगेशकर रुग्णालयाला दिला आहे. जर हा कर भरला नाही तर जप्तीची कारवाई करण्यात येईल असं ही सांगण्यात आलं आहे.
पुणे मनपाने ही नोटीस लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या व्यवस्थापकांना पाठवली आहे. लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन या मिळकतीच्या थकबाकीबाबत ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात सदर मिळकतीची सन 2024-2025 अखेर थकबाकी रक्कम रु.27,38,62,874 इतकी आहे. असं या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. शिवाय सन 2016-17 रोजी मिळकतीची करण्यात आलेली कर आकारणी आपणास मान्य नसल्याने पुणे महानगरपालिका विरुद्ध आपण दावा दाखल केलेला होता. असं ही या नोटीसमध्ये म्हटले आहे.
या दाव्याबाबत उच्च न्यायालयाने मिळकत करात समाविष्ट असलेल्या जनरल टॅक्सच्या 50 % रक्कम शिवाय उर्वरित इतर कर भरण्याबाबत कोर्टाने आदेश दिले आहेत. त्यानुसार आपणाकडे सन 2014 ते सन 2025 अखेर 22,06,76,081 इतकी थकबाकी कोर्ट आदेशानुसार दिसून येत आहे, असं ही या नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे.
SL/ML/SL
9 April 2025