भुयारी मार्गातून धावली पुणे मेट्रो…
पुणे, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका मेट्रो स्थानक ते स्वारगेट या 11.4 किमीच्या मार्गामध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा ६ किमीचा मार्ग भुयारी आहे.
या भूमिगत मार्गाच्या भुयाराचे काम टनेल बोअरिंग मशीनच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आले आहे. त्यानंतर मेट्रोच्या भुयारामध्ये ट्रक, ओव्हर हेड विद्यूत तारा, आणि सिग्नलिंगची कामे वेगाने करण्यात आली. आज रेंजहील डेपो ते रेंजहील उन्नत मेट्रो स्थानक आणि त्यानंतर रेंजहील उन्नत मेट्रो स्थानक ते शिवाजीनगर मेट्रो स्थानक त्यानंतर सिव्हिल कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्थानक अशी ३ किमीची मेट्रो चाचणी घेण्यात आली.
पुणे मेट्रोच्या महत्वाच्या टप्यांपैकी हा तांत्रिक दृष्टया अत्यंत्य महत्वाचा असा टप्पा आहे. पुणे मेट्रोचे ८५ % काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे अत्यंत वेगाने सुरु आहेत.
ML/KA/SL
7 Dec. 2022