पुणे आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेत अपघात

 पुणे आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेत अपघात

पुणे, दि. २० : पुण्यात आयोजित जागतिक पातळीच्या भव्य सायकलिंग स्पर्धेमध्ये भयंकर अपघात झाला आहे. ‘बजाज पुणे ग्रँड सायकल टूर’ स्पर्धेदरम्या एका खेळाडूचा सायकलवरील ताबा सुटल्याने मागून येणारे जवळपास 50 हून अधिक सायकलस्वार एकमेकांवर जोरात आदळले. या विचित्र अपघातात अनेक सायकलस्वार जखमी झाले असून मोठी खळबळ उडाली आहे. सुदैवाने, डोक्याला हेल्मेट असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली असली, तरी अनेक खेळाडूंना या अपघातामुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.

तिकोना किल्ल्याजवळ अरूंद रस्त्यावर अपघात झाल्याचे समोर आले आहे. नियोजनाबाबत खेळाडूंमध्ये नाराजी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धेत सुरक्षेचे सर्व नियम पाळले जात असल्याचा दावा आयोजकांनी केला होता. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर खेळाडू एकमेकांवर आदळल्याने मार्गावरील नियोजनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

437 किलोमीटर इतकं या शर्यतीचं अंतर आहे. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 असं या स्पर्धेचं औपचारिक नाव आहे. युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनलतर्फे आयोजित होणारी 2.2 मल्टी स्टेज शर्यत भारतात पहिल्यांदाज आयोजित होत आहे. या शर्यतीसाठी पुणे शहर आणि जिल्ह्यातल्या रस्त्यांमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत.

पुणे जिल्हा सायकलिंग असोसिएशन आणि राज्य सरकारच्या सहकार्याने आयोजित ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. मात्र स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी अपघात झाल्याने खळबळ उडाली आहे. स्पर्धेदरम्यान सायकलचा वेग प्रचंड असल्याने मागून येणाऱ्या खेळाडूंना ब्रेक लावणे अशक्य झाले. त्यामुळे काही क्षणातच एकावर एक सायकलींचा खच पडला. यामध्ये अनेक खेळाडूंना गंभीर दुखापत झाली असून सायकलींचे अक्षरश: तुकडे झाले होते.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *