पुणे कार अपघात, ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने घोटाळा उघड

पुणे, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कल्याणीनगर अपघात प्रकरणात आता एक नवीन माहिती समोर आली आहे. चौकशी अधिकारी डॉ. पल्लवी सापळेंनी बनवलेल्या अहवालात अल्पवयीन आरोपीऐवजी ससून रुग्णालयामध्ये त्याच्या आईचे ब्लड सॅम्पल घेतलं असल्याची माहिती आता समोर आली आहे. ससूनचे डॉक्टर श्रीहरी हरनोळ याने एकूण ३ जणांचे ब्लड सॅम्पल घेतल्याची माहिती मिळाली आहे.
अल्पवयीन आरोपीच्या आईसह दोन वृध्दांचे ब्लड सॅम्पल घेतल्याची माहिती मिळाली आहे. आईचे ब्लड सॅम्पल फॉरेन्सिक टेस्टसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. आरोपीच्या आईवरतीही कारवाईची शक्यता आहे. आरोपीच्या आईची चौकशी झाल्याचेही वृत्त आहे .गेल्या काही दिवसांपासून ब्लड सॅम्पल बदलण्याच्या बाबतीतले अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. त्यानंतर हे ब्लड सॅम्पल कोणाचं होतं यासंबधीचे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.
हे रक्त कोणाचं होतं याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नव्हती. मात्र, आता डॉ. पल्लवी सापळे यांच्या समितीने ससूनमधील चौकशीचा अहवाल बनवला होता, त्यातून अनेक बाबी उघड झाल्या आहेत. अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्याच्या उद्देशाने ससूनचे डॉक्टर श्रीहरी हरनोळ यांनी एकूण तीन जणांचे ब्लड सॅम्पल घेतल्याची बाब समोर आली आहे. त्यामध्ये एका महिलेचे रक्त होते तर दुसरे दोन वृध्द व्यक्तीचे आहे, असं या अहवालात नमुद करण्यात आलं आहे. त्यामुळे हे महिलेचे रक्त अल्पवयीन आरोपीचे असल्याचे म्हणून सांगण्यात आले आहे.
याच महिलेचे रक्त पुढे तपासणीसाठी देण्यात आलं होतं. त्यामुळे अल्पवयीन आरोपीच्या वडीलांच्या रक्तासोबत मॅच झालं नाही. त्याचा डीएनए मॅच झाला नाही. त्यानंतर आरोपीचे रक्त घेण्यात आले आणि ते त्याच्या वडीलांसोबत मॅच झालं. त्यामुळे हा प्रकार उजेडात आला आहे.
ML/ML/SL
30 May 2024