पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासात ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’

पुणे, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळच्या दिल्ली इथं होत असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन निमित्तानं *पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान *‘मराठी साहित्ययात्री संमेलन’* आयोजित करण्यात आले होते. मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत होणारे हे मराठीतील पहिलेच साहित्य संमेलन असणार आहे. या विशेष रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव देण्यात आले आहे. रेल्वे बोग्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांची नावे देण्यात आली आहे .या संमेलनाचा शुभारंभ आज पुणे रेल्वे स्थानकावर झाला .
शिवजयंतीचे औचित्य साधून सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनानंतर पुण्यातून रेल्वे निघाली , तत्पूर्वी पुस्तक दिंडीही काढली गेली . ढोल-ताशा पथक, मृदुंग, टाळवादक यांचा यात सहभाग होता .
या संमेलनाचे स्वागताध्यक्ष, राज्याचे मराठी भाषामंत्री उदय सामंत हे असून डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, साहित्य अकामदी पुरस्कारप्राप्त लेखिका डॉ. संगीता बर्वे यांची संमेलनात प्रमुख उपस्थिती लाभली होती.
महाराष्ट्रातील विविध गावा-गावांमधून साहित्यिक, युवक, लोककलाकार, स्टँडअप कॉमेडियन्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स तसेच शाहिरी आणि भजनी मंडळे संमेलनात सहभागी झाली आहेत.
मंत्री उदय सामंत यांनी देखील या विशेष रेल्वेद्वारे साहित्यीकां सोबत प्रवास केला. मराठी साहित्ययात्री संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष वैभव वाघ, मराठी साहित्ययात्री संमेलनाचे अध्यक्ष शरद तांदळे आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजे आमचे आराध्य दैवत असून कोणी समाज कंटक आमच्या दैवतां बद्दल अपप्रचार करत असतील तर अशां वृत्ती ठेचून आणि व्यक्तिं विरोधात देशद्रोहाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला पाहिजे तसेच मराठी सातित्यिक आणि मराठी साहित्या बाबत ही कोणी अपशब्द वापरत असेलतर त्यांना सडेतोड उत्तर दिले गेले पाहिजे असे मंत्री उदय सामंत म्हणाले. यावेळी पी . डी . पाटील आणि संगीता बर्वे यांनी देखील मनोगत व्यक्त केले .
ML/ML/PGB 19 Feb 2025