पुणे विमानतळाचे नाव आता ‘जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ ?
पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण ‘जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ करण्यात आले आहे. पुणे विमानतळाचे नाव जगद्गुरू संत तुकाराम महाराज विमानतळ असे नामकरण करावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी चर्चा केली होती. त्यानंतर सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे विमानतळाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. आता राज्य सरकारकडून त्याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे.