पुणेकरांसाठी महत्वाचे, भिडे पूल ‘या’ कालावधीपर्यंत वाहतुकीसाठी बंद

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पुढचा दीड महिना पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पुणे मेट्रोच्या डेक्कन जिमखाना या मेट्रो स्टेशनच्या बाजूला असलेला पादचारी पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक पुढील दीड महिने पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पुण्यातील नारायण पेठ, सदाशिव पेठ या भागातून तसेच उपनगरातून हजारोंच्या संख्येने वाहने याच भिडे पुलावरून दररोज या जा करतात. मात्र कुठलीही पूर्वसूचना न देता अचानकपणे भिडे पूल बंद झाल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होताना दिसते आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने पर्यायी मार्ग द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होते आहे.
ML/ML/PGB 18 April 2025