पुण्याच्या ताथवड्यात मित्राच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थीनीची आत्महत्या, मैत्रिणीला पाठवली होती ऑडिओ क्लिप

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्याच्या ताथवडे येथे इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने प्रियकराच्या जाचाला कंटाळून पंधराव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात एका वर्गमित्राकडून वारंवार होणाऱ्या मानसिक, शारीरिक त्रासाला कंटाळून तिने आयुष्य संपवल्याचे समोर आले आहे. तिने आपल्या मैत्रिणीला पाठवलेल्या 42 मिनिटांच्या ऑडिओ क्लिपमधून तिच्या या निर्णयामागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. तब्बल 37 दिवसांच्या तपासानंतर अखेर वाकड पोलिसांनी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहे. ती आकुर्डीतील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती. याप्रकरणी सहितीचे वडील कलुगोटाला वेंकटा सीवा रेड्डी यांनी वाकड पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार 20 वर्षीय प्रणव डोंगरे याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ML/ML/PGB 18 Feb 2025