कचरा जाळल्याने काेंडताेय शहराचा श्वास

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :शहरामध्ये अनेक ठिकाणी कचरा जाळला जात असून, ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. याचा अभ्यास केला असता प्रातिनिधिक सर्व्हेनुसार, शहरातील ७५ टक्के नागरिकांचे म्हणणे आहे की, त्यांच्या आजूबाजूला अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे वारंवार कचरा जाळला जातो.
ज्याला हॉटस्पॉट म्हणू शकतो. कचरा जाळण्याचा त्रास दररोज सहन करावा लागतो, असे ३३ टक्के नागरिकांचे म्हणणे आहे. तर आठवड्यातून एक ते दोन वेळा कचरा जाळल्याचा त्रास होतो, असे ४२ टक्के लोकांचे म्हणणे आहे. याचा अहवाल ‘परिसर’ संस्थेने तयार केला असून, ताे महापालिकेला दिला आहे. ‘पुणे एअर ऍक्शन हब’नी शहराला भेडसावत असलेल्या कचरा जाळण्याच्या प्रकरणाचा अभ्यास करून, त्याचा एक अहवाल बनविला आहे. नागरिकांना या समस्येची जाणीव असली तरी तक्रार प्रक्रियेची माहिती नसल्याचे दिसून आले आणि त्यासाठी जाणीव जागृतीची गरज आहे. सर्वेक्षणाबरोबरच पुणे मनपाकडे यापूर्वी दाखल झालेल्या तक्रारींचे विश्लेषण केले असता, मनपाकडून कारवाईला विलंब होत असून, अंमलबजावणी प्रक्रियाही सदोष आहे, असे दिसून आले. शहरातील वायू प्रदूषणात भर घालणाऱ्या कचरा जाळण्याच्या घटनांबाबतचा सविस्तर अहवाल ‘पुणे एअर एक्शन हब’ यांनी अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज एम. आणि घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख संदीप कदम यांना सादर केला.
ML/ML/PGB 30 Nov 2024