पुण्यातून बॅंकॉक, दुबईला जाता येणार, २७ ऑक्टोबरपासून विमानसेवा सुरू
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यातून नवीन दोन आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु होणार आहेत. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज (१९ सप्टेंबर) यासंदर्भातील माहिती एक्स वरून दिली आहे. दरम्यान, या आंतरराष्ट्रीय विमान सेवेमुळे पुणे शहर व पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी दोन नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे येत्या २७ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु होत असून यात पुणे-दुबई-पुणे आणि पुणे-बँकॉक-पुणे या मार्गांचा समावेश आहे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा निश्चितच फायदा होणार आहे”, असं मुरलीधर मोहोळ यांनी एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये म्हटलं आहे. सध्या पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल कार्यान्वित करण्याचेही काम पूर्ण झाले आहे. आता पुणे-दुबई आणि पुणे- बॅंकॉक थेट विमानसेवा सुरु करण्यात आल्यामुळे प्रवाशांना या विमानसेवेचा लाभ होणार आहे
TR/ML/PGB
20 Sep 2024