पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकच्या पार्श्वभूमीवर भवानी पेठ व कसबा पेठ यांच्या मतदान यंत्र तयारी व मतमोजणी व्यवस्थेची मा.महापालिका आयुक्त यांनी केली पाहणी.

 पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकच्या पार्श्वभूमीवर भवानी पेठ व कसबा पेठ यांच्या मतदान यंत्र तयारी व मतमोजणी व्यवस्थेची मा.महापालिका आयुक्त यांनी केली पाहणी.

पुणे, दि ५:–पुणे महानगरपालिकेच्या येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज दिनांक ५ जानेवारी२०२६ रोजी सकाळी भवानी पेठ येथील सावित्रीबाई फुले प्रशाला येथे व कसबा पेठ क्षेत्रिय कार्यालय यांचे न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथील मतदान प्रक्रिये संदर्भात महत्त्वपूर्ण पाहणी करण्यात आली.

या पाहणीस पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा.श्री.नवल किशोर राम, मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त(विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. कल्याण पांढरे यांच्यासह मा.उपायुक्त निवडणूक श्री. प्रसाद काटकर, मा.उपायुक्त श्री. अरविंद माळी, मा.उपायुक्त श्रीमती आशा राऊत, सहायक आयुक्त श्री. तिमया जागले, श्री. महाडिक हे उपस्थित होते.

यावेळी मतदान यंत्रांची पाहणी, स्ट्रॉंग रूमची पाहणी, मतमोजणी केंद्राची पाहणी तसेच निवडणूक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये मतदान यंत्रांची सुरक्षितता, स्ट्रॉंग रूम मधील संरक्षक व्यवस्था, सीसीटीव्ही निगराणी, अग्निशमन सुविधांची उपलब्धता तपासणी, तसेच मतमोजणी केंद्रातील आवश्यक सुविधांची पाहणी करण्यात आली. यावेळी मतदान यंत्रांची पाहणी करून तंत्रज्ञ यांच्याशी संवाद साधला.

पाहणी दरम्यान मा. आयुक्तांनी विद्युत व्यवस्था सुरक्षित ठेवणे, स्ट्रॉंग रूम व मतमोजणी केंद्रांमध्ये आवश्यक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करणे, तसेच मतमोजणीची प्रक्रिया नियोजित वेळेत, पारदर्शक व सुरळीत पार पडेल यासाठी आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक सुविधा व नियंत्रण कक्षांची योग्य व्यवस्था करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या.

निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय वातावरणात व नियमानुसार पार पडावी यासाठी सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. भवानी पेठ व कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालया मार्फत निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेत पुढील आवश्यक सुधारणा व कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *