‘द आर्ट ऑफ सस्टेनेबल हॉस्पिटॅलिटी’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंडियन इन्स्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे (IIHM)संस्थापक डॉ. सुबर्नो बोस यांनी लिहिलेल्या ‘द आर्ट ऑफ सस्टेनेबल हॉस्पिटॅलिटी’ The Art of Sustainable Hospitality या पुस्तकाचे आज पुणे येथे प्रकाशन झाले. कोविड काळात हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीवर ओढववेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.
या क्षेत्रातील नामवंतांच्या अनुभवांवर आधारित असे हे पुस्तक आहे. हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांबरोबरच या क्षेत्रातील उद्योजकांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे. सस्टेनेबल हॉस्पिटॅलिटीची ही एक कला आहे. या विषयी एक अनोखा दृष्टीकोन या पुस्तकामधुन उलगडून दाखवला आहे.
SL/KA/SL
12 Sept. 2023