पंडित जसराज यांच्या पोस्टल तिकीटाचे प्रकाशन
नवी दिल्ली, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय शास्त्रीय संगीत पद्धतीतील मेवाती घराण्याचे गायक पंडित जसराज यांच्या पोस्ट तिकिटाचे आज दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.पंडित जसराज यांच्या संगीत कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण होत असताना भारतीय टपाल विभागाने त्यांच्या स्मरणार्थ हे तिकीट जारी केले आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. पंडित जसराज यांना भारतीय सरकारने संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल २००० मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन यांना गौरविले होते.
शास्त्रीय संगीत प्रत्येक घराघरात पोहोचवणारे शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे वयाच्या 90 व्या वर्षी अमेरिकेत निधन झाले होते. पंडित जसराज आज भौतिकदृष्ट्या आपल्यात नसतील, पण त्यांचा आवाज आणि त्यांचे अस्तित्व कायम राहील.
भारतातच नाही तर जगभरात पंडित जसराज यांची ख्याती आहे.
अंटार्क्टिकाच्या दक्षिण ध्रुवावर त्यांनी शास्त्रीय गायकाने सादरीकरण केले होते. यासह सातही खंडांमध्ये कार्यक्रम सादर करणारे ते पहिले भारतीय होते.
SL/KA/SL
27 Dec. 2023