मुंबईसह राज्यातील 29 मनपा क्षेत्रांत मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर

 मुंबईसह राज्यातील 29 मनपा क्षेत्रांत मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर

मुंबई, दि. 8 : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, त्या दिवशी संबंधित क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही सुट्टी शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे, सार्वजनिक उपक्रम, बँका तसेच केंद्रशासनाची कार्यालये यांना लागू राहणार आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महानगरपालिकांचा यात समावेश आहे. निवडणूक आयोगाकडून ईव्हीएमसह सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून, प्रशासनाने नागरिकांना मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *