महाराष्ट्र रुग्णवाहिका १०८ वाहनचालकांचे आझाद मैदानात ठिय्या आंदोलन

मुंबई दि.27(एम एमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र शासनाने १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट-ब, गट-क आणि गट – ड या प्रवर्गातील कंत्राटी तत्वावर दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना सरळ सेवासमायोजन करून कायम सेवेत घेण्याची तरतूद केलेली आहे. मात्र या शासन निर्णयामध्ये दहा वर्षे निरंतर उत्कृष्ट आपात्कालीन सेवा देऊन सुद्धा १०८ रूग्णवाहिका चालकांच्या या मागणी कडे दुर्लक्ष केल्याने सरकार चे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र रुग्णवाहिका १०८ चालकांनी आज पासून ‘आझाद मैदान, येथे ठिय्या आंदोलन व आमरण उपोषण सुरू केले आहे.
२६ जानेवारी २०१४ पासून महाराष्ट्र आपात्कालीन वैद्यकीय सेवा १०८ रूग्णवाहिका हा प्रकल्प शासनाने BVG इंडिया प्राय. लिमिटेड या कंपनीला दिला आहे.
या प्रकल्पामध्ये हे वाहनचालक मागील दहा वर्षापासून कर्तव्य बजावत आहे. कौविड-१९ सारख्या वैश्विक महामारी मध्ये स्वतःच्या जीवाची व परिवाराची परवा न करता निरंतर जनसेवेसाठी रात्र-दिवस कर्तव्य पार पाडलेले आहे. तसेच अपघात, विषबाधा, सर्पदंश, हृदयविकार, प्रसूती, महापूर, आग लागणे, दरड कोसळणे अशा सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती व आपात्कालीन स्थितीमध्ये आम्ही नेहमी फ्रंट लाईनला येऊन काम करित आहोत, तसेच राजकीय जनसभा, यात्रा, व्हीआयपी दौरा, धार्मिक तथा शासकीय उत्सव-महोत्सव आणि अधिवेशन इत्यादी मध्ये सुद्धा २४ ते ४८ तास सतत सेवा देत आहोत.
तरी सरकार आमच्या मागणी बाबत गांभीर्याने घेत नाही.
महाराष्ट्र शासनाने १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट-ब, गट-क आणि ग-ड या प्रवर्गातील कंत्राटी तत्वावर दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना सरळ सेवासमायोजन करून कायम सेवेत घेण्याची तरतूद केलेली आहे. मात्र या शासन निर्णयामध्ये दहा वर्षे निरंतर उत्कृष्ट आपात्कालीन सेवा देऊन सुद्धा आम्हा १०८ रूग्णवाहिका चालकांचा कोणत्याही प्रकारचा विचार केला गेलेला नाही. त्यामुळे आमच्या सेवेवर शासनाने केलेले दुर्लक्ष आणि आमच्या मागणी पूर्ततेसाठी आम्ही ‘आझाद मैदान येथे आज पासून २७ जुन ते १२ जुलै दरम्यान ठिय्या आंदोलन व आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
SW/ML/SL
27 June 2024